अवयव दानासाठी सुरेल जनजागृती

By admin | Published: November 17, 2014 12:58 AM2014-11-17T00:58:04+5:302014-11-17T00:58:04+5:30

अवयव दान ही संकल्पना भारतीयांनी आजही पाहिजे त्या प्रमाणात स्वीकारलेली नाही. स्पेन, इंग्लंड व अन्य काही देशांशी तुलना केल्यास भारतात अवयव दान करणाऱ्यांची संख्या फारच अत्यल्प आहे.

Surail Janagruti for organ donation | अवयव दानासाठी सुरेल जनजागृती

अवयव दानासाठी सुरेल जनजागृती

Next

मोहन फाऊंडेशनचा कार्यक्रम : डॉक्टरांनी गायली गीते
नागपूर : अवयव दान ही संकल्पना भारतीयांनी आजही पाहिजे त्या प्रमाणात स्वीकारलेली नाही. स्पेन, इंग्लंड व अन्य काही देशांशी तुलना केल्यास भारतात अवयव दान करणाऱ्यांची संख्या फारच अत्यल्प आहे. यासाठी विविध बाबी कारणीभूत आहेत. ही विचारसरणी बदलण्याकरिता आज, रविवारी अवयव दानावर सुरेल जनजागृतीचा कार्यक्रम पार पडला.
देशभरात अवयव दानाची चळवळ चालवित असलेल्या मोहन फाऊंडेशनतर्फे सिव्हिल लाईन्स येथील चिटणवीस सेंटरच्या मैदानावर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात कोणी व्यावसायिक गायकाने नाही तर डॉक्टरांनी सुमधूर गीते गायली. आयोजकांनी उपस्थित श्रोत्यांना अवयव दानाचे महत्त्व पटवून देतानाच ही चळवळ अधिक व्यापक करण्यासाठी आर्थिक सहकार्य करण्याचे आवाहन केले. खरे पाहिले तर हा सांस्कृतिक कार्यक्रम नव्हताच. अवयव दानासाठी केलेला एक स्वर जागर होता. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनेकांचे नि:स्वार्थी योगदान लाभले. श्रोतेही केवळ मनोरंजनासाठी आलेले नव्हते. त्यांना या चळवळीसंदर्भात आत्मियता होती. मोकळ्या मैदानावरील या कार्यक्रमात रिमझिम पावसाने थोडा व्यत्यय आणला, पण व्यापक उद्देशापुढे अशाप्रकारचा अडथळा गौणच ठरतो.
डॉ. प्रशांत निंबाळकर यांच्या ‘गण नायकाय, गण देवताय...’ गीताने कार्यक्रमाला सुरुवात झाली. यानंतर डॉ. सुरेश अय्यर यांनी ‘आशाए...’, डॉ. गौरी अरोरा यांनी ‘आज फिर जिने की तमन्ना है...’, डॉ. सपना खानझोडे यांनी ‘कैसी पहेली है ये...’, डॉ. सुधीर भावे यांनी ‘आना है तो आ...’, डॉ. समीर जहागीरदार यांनी ‘अल्लाह के बंदे...’, डॉ. प्रदीप राजदेरकर यांनी ‘मै जिंदगी का साथ...’, डॉ. मुकुंद ओक यांनी ‘शूर आम्ही सरदार...’ तर डॉ. रवी वानखेडे यांनी ‘झगमग झगमग दिया जलाओ...’ हे गीत सादर केले. अन्य गायकांनीही श्रवणीय गीते गायली.
सुरुवातीला मोहन फाऊंडेशनच्या नागपूर केंद्राचे संचालक डॉ. रवी वानखेडे यांनी कार्यक्रमासाठी मोलाची मदत करणाऱ्यांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित केले. याशिवाय कार्यक्रमाच्या मध्यंतरात त्यांनी अवयव दानासंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Surail Janagruti for organ donation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.