सुरेश भट सभागृह आता पाच हजारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 01:47 AM2017-10-28T01:47:49+5:302017-10-28T01:48:27+5:30

महापालिकेतर्फे रेशीमबाग मैदान परिसरात उभारण्यात आलेल्या कविवर्य सुरेश भट या भव्य सभागृहात चिमुकल्यांसह हौशी कलावंतांना आपली नाटकाची हौस भागविणे आता काहिसे परवडणार आहे.

The Suresh Bhat Auditorium is now in five thousand | सुरेश भट सभागृह आता पाच हजारात

सुरेश भट सभागृह आता पाच हजारात

googlenewsNext
ठळक मुद्देमनपाने केली दरात घट : हौशी रंगकर्मींना दिलासा : १३०० आसनांसाठी सवलत

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेतर्फे रेशीमबाग मैदान परिसरात उभारण्यात आलेल्या कविवर्य सुरेश भट या भव्य सभागृहात चिमुकल्यांसह हौशी कलावंतांना आपली नाटकाची हौस भागविणे आता काहिसे परवडणार आहे. चिमुकल्यांची नाटके, नाट्य परिषद, साहित्य संघ तसेच चॅरिटेबल ट्रस्टच्या सांस्कृतिक कार्यक्रम तसेच महापालिकेच्या शाळा व अनुदानित शाळांच्या कार्यक्रमासाठी १३०० आसन क्षमतेसाठी आता फक्त पाच हजार रुपये भाडे आकारण्यात येणार आहे. याशिवाय अनामत रकमही कमी करण्यात आली आहे. लोकमतने या विषयाला वाचा फोडल्यानंतर महापालिकेच्या स्थायी समितीने शुक्रवारी दर कपातीवर शिक्कामोर्तब केले.

Web Title: The Suresh Bhat Auditorium is now in five thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.