सर्जरी कॅज्युअल्टी रुग्ण सेवेत

By admin | Published: January 14, 2015 12:43 AM2015-01-14T00:43:30+5:302015-01-14T00:43:30+5:30

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) अपघात विभागात (कॅज्युअल्टी) होणारी गर्दी कमी करण्यासाठी आणि गंभीर रुग्णांना तत्काळ उपचार मिळावा यासाठी मेडिसीन व सर्जरी

Surgery Cage Jurisprudence | सर्जरी कॅज्युअल्टी रुग्ण सेवेत

सर्जरी कॅज्युअल्टी रुग्ण सेवेत

Next

मेडिकल : गर्दी कमी झाल्याने तत्काळ उपचार
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) अपघात विभागात (कॅज्युअल्टी) होणारी गर्दी कमी करण्यासाठी आणि गंभीर रुग्णांना तत्काळ उपचार मिळावा यासाठी मेडिसीन व सर्जरी कॅज्युअल्टी वेगवेगळी करण्याचा महत्त्वाचा निर्णय अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी घेतला. सोमवारपासून सुरू झालेल्या या कॅज्युअल्टीमुळे गंभीर रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण कमी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
मेडिकलमध्ये मागील वर्षी १.९१ कोटी रुपये खर्च करून जुना अपघात विभाग बंद करून नवीन अपघात विभाग सुरू करण्यात आला. तीन मजल्यांचा प्रस्तावित असलेला हा विभाग मात्र तळमजल्यापर्यंतच मर्यादित राहिला. यातच अपघाती रुग्णांसाठी येथे विशेष सोयी उपलब्ध नव्हती. विशेष म्हणजे अतिदक्षता विभागाला वॉर्डाचे स्वरूप देण्यात आले होते.
परिणामी रुग्णांची होत असलेली गर्दी, उपचारात होणारा उशीर, यातूनच निर्माण होणारे डॉक्टर आणि रुग्णांमध्ये वादावादीच्या प्रसंगामुळे मेडिकल प्रशासन अडचणीत आले होते.
डॉ. निसवाडे यांच्याकडे पदभार येताच त्यांनी रुग्णाच्या सोयीसाठी कॅज्युअल्टीचे दोन विभाग करण्याचा निर्णय घेतला. जुन्या बंद असलेल्या कॅज्युअल्टीमध्ये अपघाताच्या रुग्णांवर तत्काळ उपचार करण्याची यंत्रणा उभी केली.
त्यातही गंभीर असलेल्या रुग्णांसाठी या विभागात सहा खाटांचे अतिदक्षता विभागही निर्माण केले. सोमवारपासून हा विभाग रुग्णसेवेत येताच पहिल्याच दिवशी ५३ रुग्णांवर उपचार करण्यात आले तर नव्या कॅज्युअल्टीमध्ये जनरल मेडिसीन व पिडीयाट्रीक मेडिसीनचे रुग्ण तपासले जात आहे. ज्या रुग्णाच्या जीवाला धोका आहे अशा रुग्णांसाठी १५ खाटांचे अतिदक्षता विभाग सुरू करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या दोन्ही कॅज्युअल्टीच्या स्वच्छतेला घेऊन रुग्णांकडून कौतुक होत आहे.(प्रतिनिधी)

Web Title: Surgery Cage Jurisprudence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.