विविध शासकीय कार्यालयात सर्जिकल स्ट्राईक,  ५० दलालांना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2017 11:13 PM2017-08-08T23:13:19+5:302017-08-08T23:13:29+5:30

गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी पुन्हा एकदा जिल्हाधिकारी आणि परिवहन अधिका-यांच्या कार्यालयासह १४ शासकीय कार्यालयात सर्जिकल स्ट्राईक केला. बनावट सही-शिक्क्यांचा वापर करून बनावट प्रमाणपत्र तयार करणा-या आणि सर्वसामान्य नागरिकांसोबतच शासनाचीही फसवणूक करणा-यांमध्ये खळबळ उडवून दिली.

Surgical strikes, 50 brokers arrested in different government offices | विविध शासकीय कार्यालयात सर्जिकल स्ट्राईक,  ५० दलालांना अटक 

विविध शासकीय कार्यालयात सर्जिकल स्ट्राईक,  ५० दलालांना अटक 

Next

नागपूर, दि. 8 -   गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी पुन्हा एकदा जिल्हाधिकारी आणि परिवहन अधिका-यांच्या कार्यालयासह १४ शासकीय कार्यालयात सर्जिकल स्ट्राईक केला. बनावट सही-शिक्क्यांचा वापर करून बनावट प्रमाणपत्र तयार करणा-या आणि सर्वसामान्य नागरिकांसोबतच शासनाचीही फसवणूक करणा-यांमध्ये खळबळ उडवून दिली. दिवसभर चाललेल्या या कारवाईत पोलिसांनी ५० दलालांना पकडले. त्याचप्रमाणे ७८ संशयितांची तपासणी केली. 

जून २०१७ मध्ये गुन्हे शाखेच्या पथकाने विविध शासकीय कार्यालयात अशाच प्रकारची वैशिष्ट्यपूर्ण कारवाई करून दलालांना जेरबंद केले होते. बोगस डॉक्टर, तहसीलदारांच्या सह्या शिक्के मारून विविध प्रकारची प्रमाणपत्र देणाºयांना अटक केली होती. त्यामुळे दलालांना काही दिवस चाप बसला होता. आता परत दलाल सक्रिय झाल्याचे कळताच पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, सहआयुक्त शिवाजीराव बोडखे, गुन्हे शाखेचे उपायुक्त संभाजी कदम आणि सहायक आयुक्त सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखेतील १६ अधिकारी आणि ६० कर्मचा-यांची १० पथके तयार करून १४  शासकीय कार्यालयात मोहीम राबविण्यात आली.   जाती प्रमाणपत्र तयार करणे, डोमिसाईल, नॉनक्रिमीलेअर, प्रतिज्ञापत्र, साक्षीदारांच्या सह्या घेणे, उत्पन्नाचा दाखला, प्रेमविवाहाच्या वेळी बनावट साक्षीदार हजर करणे तसेच विविध प्रकारची कागदपत्रे तयार करणाºया   वाहतूक परवाना, नुतनीकरण, परमिट, टॅक्स, आखीव पत्रिका तसेच भूखंडांसंबंधित दस्तावेज तयार करणाºया दलाल आणि व्हेंडरची धरपकड केली. एकूण ७८ व्हेंडरची तपासणी करण्यात आली तर ५० दलालांना अटक करण्यात आली. 

डॉक्टरचे फिटनेस सर्टिफिकेट...

पोलिसांच्या चौकशीत रजनीश विकास गायकवाड (वय ४२, रा. टेका नाका, पाचपावली) हा आरोपी कामठी मार्गावरील प्रादेशिक परिवहन कार्यालय लाल गोडावून,जरीपटका येथे आढळला. त्याच्याजवळून पोलिसांनी १४ मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट जप्त केले. त्यावर डॉ. शशांक झलक (एमबीबीएस रजि. क्र. २००४/ ०२ / ०८५८) यांच्या नावे ठप्पे मारलेले आहेत. गायकवाडकडे रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीचा शिक्काही आढळला. त्याच्याविरुद्ध जरीपटका ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पकडलेले दलाल....

जिल्हाधिकारी कार्यालय परिसर - ०६

प्रशासकीय इमारत परिसर - ०७

तहसील कार्यालय - ०५ 

परिवहन कार्यालय (गिरीपेठ) - ०६

परिवहन कार्यालय (जरीपटका)- १०

परिवहन कार्यालय (पारडी कळमना) १२

सह निबंधक कार्यालय - ४

Web Title: Surgical strikes, 50 brokers arrested in different government offices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.