नागपूर जिल्ह्यात सर्वेक्षणात सापडले ६४१ कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2020 11:37 PM2020-10-03T23:37:20+5:302020-10-03T23:38:31+5:30
Nagpur district, Collector,Corona Positive ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील ३ लाख ४८ हजार ८७० घरांना भेटी देऊन सुमारे १४ लाख २१ हजार ११३ व्यक्तींची आरोग्यविषयक तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. १ हजार ९९४ पथकांद्वारे सर्वेक्षणाचे काम सुरू असून या सर्वेक्षणामध्ये ६४१ व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आले, अशी माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी आज दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील ३ लाख ४८ हजार ८७० घरांना भेटी देऊन सुमारे १४ लाख २१ हजार ११३ व्यक्तींची आरोग्यविषयक तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. १ हजार ९९४ पथकांद्वारे सर्वेक्षणाचे काम सुरू असून या सर्वेक्षणामध्ये ६४१ व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आले, अशी माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी आज दिली.
या अभियानांतर्गत सारी व संशयित कोरोनाबाधित ७६७ रुग्ण आढळून आले असून त्यांची आरटीपीसीआर तपासणी केली असता ६४१ रुग्ण बाधित निघाले. त्यासोबतच १५,६२९ व्यक्ती मधुमेह आजाराचे, २,६७५ रुग्ण उच्च रक्तदाबाचे, २१९ रुग्ण किडनी आजाराचे, २०३ रुग्ण यकृताच्या आजाराचे तर १३,९६८ रुग्ण इतर व्याधींनी बाधित असल्याचे आढळून आले आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक नागरिकांच्या तपासणीमध्ये कळमेश्वर तालुक्यात ९५.७४ टक्के, रामटेक ९०.१५ टक्के, उमरेड ९३.२४ टक्के, भिवापूर ७१.३३ टक्के, कुही ७५.७७ टक्के, मौदा ७९.२३ टक्के, नरखेड ८८.७० टक्के, सावनेर ६३.८६ टक्के, हिंगणा ६३.९८ टक्के, पारशिवनी ५३ टक्के, कामठी ४८ टक्के, काटोल ४७.४६ टक्के, नागपूर ग्रामीण १६ टक्के सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. या तपासणीमध्ये नरखेड तालुक्यात १३० संशयितांची तपासणी केली असता १०३ सारी आजाराचे तर १७ कोरोनाबाधित आढळले आहेत. कोरोनाबाधित रुग्णांमध्ये नागपूर ग्रामीण ४२, कामठी ९२, हिंगणा ६४, काटोल ४३, सावनेर ८४, कळमेश्वर ९५, रामटेक १७, पारशिवनी ५७, मौदा २५, उमरेड १९, भिवापूर ४६ तर कुही तालुक्यात ४० बाधित रुग्ण असल्याचे स्पष्ट झाले आहे.
१,७१७ आशांद्वारे सर्वेक्षणाचे काम
‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेच्या सर्वेक्षणामध्ये तयार करण्यात आलेल्या पथकांमध्ये १,७१७ आशा सर्वेक्षणाचे काम करीत असून त्यांच्या मदतीला १११ अंगणवाडी सेविकांची नियुक्ती करण्यात आली आहे.