गाेदाम परिसरात जीवघेणे खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:09 AM2021-03-23T04:09:52+5:302021-03-23T04:09:52+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क वाडी : शहरातील काही भागांत विविध कंपन्यांची माेठ्या प्रमाणात गाेदामे आहेत. या भागातील राेडवर ठिकठिकाणी माेठमाेठे ...

Survival pits in Gadam area | गाेदाम परिसरात जीवघेणे खड्डे

गाेदाम परिसरात जीवघेणे खड्डे

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

वाडी : शहरातील काही भागांत विविध कंपन्यांची माेठ्या प्रमाणात गाेदामे आहेत. या भागातील राेडवर ठिकठिकाणी माेठमाेठे खड्डे तयार झाले असून, त्यात पावसाचे पाणी साचून राहते. हे खड्डे जीवघेणे बनत चालले आहेत. दुसरीकडे, पालिका प्रशासन ट्रान्सपाेर्ट व्यावसायिकांकडून व्यावसायिक कर वसूल करीत असून, या भागात काेणत्याही मूलभूत सुधारणा करीत नसल्याने त्यांच्यात असंताेषाचे वातावरण निर्माण हाेत आहे.

वाडी शहराची लाेकसंख्या एक लाखांच्या आसपास आहे. एकूण २५ वाॅर्ड असलेल्या या शहरातील काही वाॅर्डवगळता कंट्रोलवाडी, शाहू ले-आउट, कोहळे ले-आउट, आदर्शनगर, माऊलीनगर, विकासनगर, खडगाव रोड व वर्मा ले-आउट या भागात मोठ्या प्रमाणात गोदामे असल्याने जड वाहनांची २४ तास वर्दळ सुरू असते. खडगाव मार्गावरील शाहू ले-आउटजवळील वर्मा ले-आउट समस्यांचे माहेरघर बनले आहे.

या भागातील रस्ते अक्षरश: खड्ड्यात गेले आहेत. पावसाची सर काेसळताच या रस्त्यांना डबक्यांचे स्वरूप प्राप्त हाेते. शिवाय, सर्वत्र चिखल तयार हाेताे. कुबट वातावरणामुळे दुर्गंधीही पसरते. याच वातावरणात गाेदामांमध्ये काम करणाऱ्या कामगारांना दिवसभर कामे करावी लागत असल्याने त्यांच्या आराेग्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या डबक्यांमधून मार्गक्रमण करताना वाहनचालकांना कसरत करावी लागत असून, प्रसंगी अपघातांनाही सामाेरे जावे लागते. त्यामुळे ही समस्या साेडविण्याची मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.

....

नागरिकांचा अपेक्षाभंग

वाडी ग्रामपंचायतीचे नगर परिषदेमध्ये रूपांतर झाल्यानंतर शहरातील नागरी वस्तींमध्ये असलेल्या मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा हाेईल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली हाेती. ग्रामपंचायतीच्या तुलनेत नगर परिषदेमध्ये विविध कर वाढले. मात्र, नागरिकांना पाच वर्षांनंतरही अपेक्षेनुरूप सुविधा मिळाल्या नाहीत. या भागात राहणारे गाेदाममालक आणि ट्रान्सपाेर्ट व्यावसायिक स्थानिक नगर परिषदेला नियमित व्यावसायिक कर देतात. तुलनेत पालिका प्रशासनाकडून सुविधा पुरविल्या जात नाही, असा आराेप या व्यावसायिकांनी केला आहे. त्यामुळे नागरिकांचा अपेक्षाभंग झाला आहे.

Web Title: Survival pits in Gadam area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.