सूर्यवंशी यांनी स्वीकारला एनएमआरडीएचा पदभार ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:09 AM2021-02-09T04:09:02+5:302021-02-09T04:09:02+5:30

नागपूर : नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त म्हणून मनोज सूर्यवंशी यांनी सोमवारी पदभार स्वीकारला. मनोज सूर्यवंशी यांच्याकडे नागपूर ...

Suryavanshi accepts charge of NMRDA () | सूर्यवंशी यांनी स्वीकारला एनएमआरडीएचा पदभार ()

सूर्यवंशी यांनी स्वीकारला एनएमआरडीएचा पदभार ()

Next

नागपूर : नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त म्हणून मनोज सूर्यवंशी यांनी सोमवारी पदभार स्वीकारला. मनोज सूर्यवंशी यांच्याकडे नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती म्हणूनही अतिरिक्त जबाबदारी असेल.

सूर्यवंशी हे भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) २०१० बॅचचे अधिकारी आहेत. अन्न व नागरी पुरवठा विभागाचे अप्पर सहसचिव पदावरून त्यांची याठिकाणी बदली झाली आहे. आयएएस अधिकारी शीतल तेली-उगले यांच्याहस्ते सूर्यवंशी यांचे स्वागत करण्यात आले. सिव्हिल इंजिनिअर असलेले सूर्यवंशी यांनी नागपूर विभागात यापूर्वी महसूल उपायुक्त, अप्पर आयुक्त तसेच भंडारा, वर्धा जिल्ह्यातही त्यांनी विविध प्रशासकीय पदांवर सेवा दिली आहे.

यावेळी अप्पर आयुक्त हेमंत पवार, नासुप्रचे महाव्यवस्थापक व नगररचना विभागाचे उपसंचालक लांडे, अधीक्षक अभियंता लीना उपाध्ये, कार्यकारी अधिकारी संजय पोहेकर उपस्थित होते.

Web Title: Suryavanshi accepts charge of NMRDA ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.