सूर्योदय कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:26 AM2020-12-14T04:26:03+5:302020-12-14T04:26:03+5:30
- ‘इंडस्ट्री ४.०’ उपक्रमांतर्गत विकास व उद्योजकता केंद्र : विद्यार्थ्यांना उद्योजक बनविण्याचा उद्देश नागपूर : काळाची गरज ओळखून आणि ...
- ‘इंडस्ट्री ४.०’ उपक्रमांतर्गत विकास व उद्योजकता केंद्र : विद्यार्थ्यांना उद्योजक बनविण्याचा उद्देश
नागपूर : काळाची गरज ओळखून आणि नवीन शैक्षणिक धोरणाला नजरेसमोर ठेवून देशातील नामांकित विद्यापीठांनी आणि महाविद्यालयांनी त्या दिशेने पाऊल टाकायला सुरुवात केलेली आहे. असेच एक नाव म्हणजे मध्य भारतातील शैक्षणिक संस्था सूर्योदय कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी. सूर्योदय कॉलेजमध्ये ‘इंडस्ट्री ४.०’ हा प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे. उद्घाटन केंद्रीय नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी माजी आ. सुधाकर कोहळे, नामांकित कंपन्यांचे व्यवस्थापकीय संचालक जसे दीपक एन.जी. (दसाल्ट सिस्टीम), विनीत सेठ, नीरज देशपांडे (पीटीसी), डीसीएसचे प्रमुख सल्लागार अनुज शर्मा आणि राहुल नायडू उपस्थित होते. विद्यार्थ्यांचा कौशल्य विकास, ही काळाची गरज असल्याचे मत गडकरी यांनी व्यक्त केले.
संस्थेचे अध्यक्ष दीपक चाफले यांनी हा प्रकल्प म्हणजे स्वप्नपूर्ती होत असल्याचे मत व्यक्त केले. प्राचार्य डॉ. व्ही. जी. अराजपुरे यांनी मान्यवरांचे स्वागत करून आभार व्यक्त केले. केंद्राच्या व्यवस्थापकीय संचालक प्रा. रसिका चाफले यांनी केंद्राच्या उद्दिष्टांवर भर दिला. हा महाराष्ट्रातील पहिला आणि देशातील सहावा प्रकल्प आहे. ही विदर्भासाठी गौरवाची बाब आहे. ‘इंडस्ट्री ४.०’ या उपक्रमांतर्गत विकास आणि उद्योजकता केंद्र सुरू करण्यात आले आहे. जगद्विख्यात कंपन्या दसाल्ट सिस्टीम, मास्टर कॅम, पीटीसी या केंद्राला अद्ययावत जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान पुरवित असून डीसीएस प्रशिक्षण देण्यासाठी सहभागी झाले आहेत. आयओटी आणि स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग या अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.
या केंद्राचा उद्देश विद्यार्थ्यांना उद्योजक बनविण्याचा आहे. त्यामुळे ते रोजगार देणारे बनतील. ग्लोबल स्तरावरील तंत्रज्ञान लोकल पातळीवर उपयोगात येणे हे ही तितकेच महत्त्वाचे आहे. ग्लोबल ते लोकल आणि पुन्हा लोकल ते ग्लोबल हा या केंद्राचा उद्देश आहे आणि हीच काळाची गरज आहे