सुसाट कार दुभाजकावर धडकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:13 AM2021-08-18T04:13:12+5:302021-08-18T04:13:12+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क सावनेर : चालकाचा ताबा सुटल्याने वेगात असलेली कार दुभाजकावर धडकली. त्यात कारमधील एकाचा मृत्यू झाला तर ...

Susat hit the car divider | सुसाट कार दुभाजकावर धडकली

सुसाट कार दुभाजकावर धडकली

googlenewsNext

लाेकमत न्यूज नेटवर्क

सावनेर : चालकाचा ताबा सुटल्याने वेगात असलेली कार दुभाजकावर धडकली. त्यात कारमधील एकाचा मृत्यू झाला तर एक गंभीर व कारचालक किरकाेळ जखमी झाला. ही घटना सावनेर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-पांढुर्णा मार्गावरील गुजरखेडी शिवारात नुकतीच घडली.

साेमन पलटू भारती (५०, रा. शिवपुरी, जिल्हा छिंदवाडा, मध्य प्रदेश) असे मृताचे नाव असून, राहुल साेमन भारती (१८, रा. शिवपुरी, जिल्हा छिंदवाडा, मध्य प्रदेश) असे गंभीर आणि शिवम अर्जुन वर्मा, रा, इंदिरानगर, छिंदवाडा, मध्य प्रदेश असे किरकाेळ जखमीचे नाव आहे. तिघेही एमपी-२८/सीए-८३१९ क्रमांकाच्या कारने सावनेर मार्गे नागपूरला जात हाेते. शिवम कार चालवीत हाेता तर राहुल व साेमन मागे बसले हाेते.

दरम्यान, सावनेर शहरानजीकच्या गुजरखेडी येथे शिवमचा कारवरील ताबा सुटला व वेगात असलेली कार दुभाजकावर धडकली. यात राहुल व साेमन यांना गंभीर तर शिवमला किरकाेळ दुखापत झाली. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून तिघांनाही सावनेर येथील शासकीय रुग्णालयात आणले. तिथे राहुल व साेमनवर प्रथमाेपचार करून त्यांना नागपूर शहरातील मेडिकल हाॅस्पिटलमध्ये भरती केले. शिवाय, शिवमला सुटी देण्यात आली. साेमनचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी सावनेर पाेलिसांनी कारचालकाविरुद्ध भादंवि २७९, ३३७, ३०४ (अ) अन्वये गुन्हा नाेंदविला असून, या घटनेचा तपास पाेलीस उपनिरीक्षक विनाेद मांढरे करीत आहेत.

Web Title: Susat hit the car divider

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.