विवाहितेची संशयास्पद आत्महत्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:07 AM2021-07-15T04:07:37+5:302021-07-15T04:07:37+5:30
आरती दीपक मारबते (२४) रा. तास असे मृत महिलेचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार आरती मंगळवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास ...
आरती दीपक मारबते (२४) रा. तास असे मृत महिलेचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार आरती मंगळवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घरून निघून गेली व गावातीलच ग्रामपंचायतीच्या शासकीय विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केली. याबाबत माहिती मिळताच ठाणेदार महेश भोरटेकर यांच्यासह पोलीस घटनास्थळी पोहचले. लागलीच त्यांनी तिला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न चालविले. मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास मृतदेह बाहेर काढण्यात आला. बुधवारी सकाळी शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांच्या सुपूर्द करण्यात आला. आरतीला दीड वर्षाची मुलगी आहे. पती दीपक हा मजुरीचे काम करतो. पती-पत्नी यांच्यातील वाद विकोपाला गेल्याने ही दुर्दैवी घटना घडल्याचे बोलले जाते. -----
आरतीच्या आईवडिलांची पोलिसात तक्रार
आरतीच्या मृत्यूबाबत माहिती न देता तिच्या सासरच्या मंडळीनी परस्पर अंत्यसंस्काराचा प्रयत्न केला असा आरोप करत, आरतीची आई वच्छला व वडील ईश्वर मोहनकर रा. तारणा यांनी भिवापूर पोलिसात तक्रार नोंदविली आहे. आरतीच्या मृत्यूला पती दीपक, त्याचा भाऊ, आई व आजोबा या चार जणांविरुध्द तक्रार नोंदविली आहे. शिवाय आरतीची आत्महत्या नसून हत्या असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे. सासरच्या मंडळीकडून तिचा छळ होत होता, असा आरोप त्यांनी केला आहे.