नागपुरातून बेपत्ता मुलींच्या अपहरणाचा संशय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 07:59 PM2018-03-13T19:59:25+5:302018-03-13T20:00:24+5:30
सदरमधून संशयास्पदरीत्या बेपत्ता झालेल्या दोन शाळकरी मुलींचा अद्यापही शोध लागला नसल्याने त्यांचे अपहरण झाल्याचा संशय बळावला आहे. दरम्यान, पोलिसांसोबतच आता कुटुंबीयांनीही मुलीचे अपहरण करणाऱ्या संशयितांना अधोेरेखित करण्यासाठी धावपळ चालवली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सदरमधून संशयास्पदरीत्या बेपत्ता झालेल्या दोन शाळकरी मुलींचा अद्यापही शोध लागला नसल्याने त्यांचे अपहरण झाल्याचा संशय बळावला आहे. दरम्यान, पोलिसांसोबतच आता कुटुंबीयांनीही मुलीचे अपहरण करणाऱ्या संशयितांना अधोेरेखित करण्यासाठी धावपळ चालवली आहे. पायल सुधीर टेंभुर्णे (वय १३) आणि तनिशा चरणदास टेंभुर्णे (वय १४) अशी बेपत्ता मुलींची नावे आहेत. या दोघी चुलत बहिणी असून, सदरमध्ये मोहननगर, खलाशी लाईनमध्ये त्यांचे निवासस्थान आहे. दुकानातून रिबीन घेऊन येतो असे सांगून या दोघी १६ फेब्रुवारीला घराबाहेर गेल्या. रात्र झाली तरी त्या परतल्या नाही, त्यामुळे पालकांनी त्यांची शोधाशोध केली. मात्र, त्यांचा शोध लागला नाही. अभ्यासात हुशार असलेल्या या दोघी सोबत घरून निघून जाण्याचे कोणतेही कारण नाही. त्यांचे कुणीतरी पूर्वनियोजित पद्धतीने अपहरणच केले असावे, असा दाट संशय आहे. पालकांनी सदर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, त्यात अपहरणाचा संशय व्यक्त केला आहे. सदरचे ठाणेदार सुनील बोंडे आणि त्यांच्या सहकाºयांनी या मुलींचा शोध घेण्यासाठी प्रयत्न चालविले आहे. मुलींच्या मैत्रिणी आणि ओळखीच्यांकडून काही धागेदोरे मिळाल्याचे समजते. या दोघींना गुंगीचे औषध देऊन कुणीतरी पळवून नेल्याचा संशय दाट झाला आहे.
सायबर सेलचीही मदत
पायल आणि तनिशा तसेच त्यांना पळवून नेणाºयांचा पोलीस शोध घेत आहेत. सायबर सेलचीही यासाठी मदत घेतली जात आहे. या संबंधाने सदर पोलिसांकडे विचारणा केली असता, प्रकरण संवेदनशील असून, त्याबद्दल काही बोलणे योग्य होणार नसल्याचे पोलीस सांगत आहेत. बेपत्ता मुलींचा शोध घेतला जात आहे, एवढेच पोलीस सांगत आहेत. दरम्यान, महिनाभरापासून मुली बेपत्ता असल्याने मुलींच्या आईची प्रकृती ढासळली आहे.