अरुंधतींवरील अवमानना कारवाईस स्थगिती

By admin | Published: July 4, 2017 05:13 AM2017-07-04T05:13:19+5:302017-07-04T05:13:19+5:30

बुकर पुरस्कारप्राप्त लेखिका व मानवाधिकार कार्यकर्त्या अरुंधती रॉय यांच्याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रलंबित

Suspension on Arundhati's contempt proceedings | अरुंधतींवरील अवमानना कारवाईस स्थगिती

अरुंधतींवरील अवमानना कारवाईस स्थगिती

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बुकर पुरस्कारप्राप्त लेखिका व मानवाधिकार कार्यकर्त्या अरुंधती रॉय यांच्याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रलंबित फौजदारी अवमानना याचिकेवरील कार्यवाहीस सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी अंतरिम स्थगिती दिली. या आदेशामुळे रॉय यांना तूर्तास दिलासा मिळाला.
माओवादी डॉ. गोकराकोंडा नागा साईबाबाच्या जामिनावरून लिहिलेल्या लेखात न्यायव्यवस्थेवर अतिशय गंभीर व निंदास्पद आरोप केल्यामुळे रॉय यांच्याविरुद्ध नागपूर खंडपीठाचे तत्कालीन न्यायमूर्ती अरुण चौधरी यांनी स्वत:च फौजदारी अवमानना याचिका दाखल करून घेतली होती. या निर्णयाला रॉय यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

Web Title: Suspension on Arundhati's contempt proceedings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.