नागपूर मेट्रो रेल्वे कामादरम्यान झालेल्या अपघाताप्रकरणी दोन जणांवर निलंबनाची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2017 08:26 AM2017-10-10T08:26:31+5:302017-10-10T08:28:12+5:30

मेट्रो रेल्वेच्या कामादरम्यान झालेल्या अपघाता प्रकरणी दोन जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

Suspension proceedings for two people in the accident case related to the Nagpur Metro Railway | नागपूर मेट्रो रेल्वे कामादरम्यान झालेल्या अपघाताप्रकरणी दोन जणांवर निलंबनाची कारवाई

नागपूर मेट्रो रेल्वे कामादरम्यान झालेल्या अपघाताप्रकरणी दोन जणांवर निलंबनाची कारवाई

Next
ठळक मुद्दे मेट्रो रेल्वेच्या कामादरम्यान झालेल्या अपघाता प्रकरणी दोन जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मेट्रोच्या कंत्राटदार कंपनीचा प्रभारी अभियंत्याला निलंबित करण्यात आलं आहे.

नागपूर- मेट्रो रेल्वेच्या कामादरम्यान झालेल्या अपघाता प्रकरणी दोन जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मेट्रोच्या कंत्राटदार कंपनीचा प्रभारी अभियंत्याला निलंबित करण्यात आलं आहे. सुरक्षा सांभाळणाऱ्या प्रभारी अभियंत्याचं निलंबन झालं आहे. मेट्रो रेल्वेच्या बांधकामासाठी वापरला जाणारा लोखंडी कॉर्टर पिलर रविवारी दुचाकीवर पडल्याने एक महिला गंभीर जखमी झाली होती. या अपघातात त्या महिलेची सासूही जखमी झाली. आजीच्या कडेवर असलेली जखमी महिलेची मुलगी सुदैवाने बचावली. सेंट्रल एव्हेन्यूवर रविवारी दुपारी १२.१५ च्या सुमारास झालेल्या या अपघातानंतर तेथे प्रचंड तणाव निर्माण झाला होता.  हा अपघात मेट्रोच्या अधिकारी आणि कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळेच झाल्याचा आरोप करून नागरिकांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची जोरदार मागणी केली होती.

लकडगंजचे सहायक पोलीस उपनिरीक्षक एस. अ‍ॅन्थोनी यांनी मेट्रोचे काम करणारे कमलकिशोर सुरेंद्रकुमार शर्मा (वय ४८, रा. सुभाषनगर नजिमाबाद, जि. बीजनौर), सहायक अभियंता निलेश पराते, नरेंद्र कुमार आणि शिशिर सिंग यांच्याविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल झाला होता. 

अपघात कसा घडला ?
हिवरीनगर, भीम चौक नंदनवन येथे राहणा-या अमी जोशी, दीड वर्षीय मिरा नामक मुलगी आणि सासू साधना जोशी यांच्यासह अ‍ॅक्टिव्हाने (एमएच ४९/ क्यू ०५३७) गांधीबागकडे जात होत्या. सेंट्रल एव्हेन्यूवरील छापरू नगर-आंबेडकर चौकाजवळच्या हनीशीला अपार्टमेंट समोर अचानक मेट्रोच्या कामासाठी लावलेला एक लोखंडी कॉर्टर पिल्लर जोशी यांच्या दुचाकीवर आदळला. त्यामुळे डोक्याला दुखापत होऊन अमी जोशी गंभीर जखमी झाल्या. त्यांच्या मागे बसलेल्या सासू साधना यांनाही मार लागला.
सुदैवाने आजीच्या कडेवर असलेल्या चिमुकल्या मिराला मात्र दुखापत झाली नाही. अपघातानंतर घटनास्थळी प्रचंड तणाव निर्माण झाला. या तिघींनाही तातडीने बाजुच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले. जमाव वाढत असल्याने या भागातील वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे तणावात मोठी भर पडली. वाहतूक पोलीस आणि लकडगंज पोलिसांचा ताफा पोहचला. त्यांनी जमावाला कसेबसे शांत केले.

Web Title: Suspension proceedings for two people in the accident case related to the Nagpur Metro Railway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.