प्रेमविवाहानंतर संशय कल्लोळ : विभक्त पत्नीच्या हत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 12:14 AM2021-02-23T00:14:35+5:302021-02-23T00:16:08+5:30

Attempted murder, crime news विरोध डावलून प्रेमविवाह करणाऱ्या प्रेमीयुगुलात संशयकल्लोळ वाढला. त्यामुळे त्यांचे पटेनासे झाले. या पार्श्वभूमीवर विभक्त झालेल्या पत्नीने दुसरा घरठाव करण्याची भाषा वापरल्याने तिच्या नवऱ्याने चाकूने भोसकून तिची हत्या करण्याचा प्रयत्न केला.

Suspicion after love marriage: Attempted murder of divorced wife | प्रेमविवाहानंतर संशय कल्लोळ : विभक्त पत्नीच्या हत्येचा प्रयत्न

प्रेमविवाहानंतर संशय कल्लोळ : विभक्त पत्नीच्या हत्येचा प्रयत्न

Next
ठळक मुद्दे आरोपीला ठोकल्या पोलिसांनी बेड्या

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : विरोध डावलून प्रेमविवाह करणाऱ्या प्रेमीयुगुलात संशयकल्लोळ वाढला. त्यामुळे त्यांचे पटेनासे झाले. या पार्श्वभूमीवर विभक्त झालेल्या पत्नीने दुसरा घरठाव करण्याची भाषा वापरल्याने तिच्या नवऱ्याने चाकूने भोसकून तिची हत्या करण्याचा प्रयत्न केला. यात ईशिका विलास उईके (वय २०) ही गंभीर जखमी झाली. सोमवारी रात्री बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

सूर्यकांत दुरसिंग शाहू (वय ३०) असे आरोपीचे नाव आहे. तो एमआयडीसीतील राजीवनगरात राहतो. गणेशपेठेतील एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करणाऱ्या सूर्यकांतचे ईशिकासोबत तीन वर्षांपूर्वी प्रेमसंबंध जुळले. ‘जिना मरना तेरे संग’ असा निर्णय घेऊन त्यांनी लग्न करण्याची तयारी केली. त्यासाठी घरच्यांचा विरोधही पत्करला. दोन वर्षांपूर्वी त्यांनी लग्न केले. मात्र, सुरुवातीचे काही महिने वगळता नंतर ते एकमेकांवर संशय घेऊ लागले. त्यांच्यातील संशयकल्लोळ वाढला. शिवीगाळ, मारहाणीचे प्रकार सुरू झाल्याने सहा महिन्यांपूर्वी ईशिकाने नवऱ्याचे घर सोडून मैत्रिणीसोबत लक्ष्मीनगर झोपडपट्टीत रूम भाड्याने घेतली. ती एका रेस्टॉरेंटमध्ये हेल्परचे काम करू लागली. ते दोघे विभक्त झाले. मात्र, अधूनमधून ते एकमेकांशी बोलत होते. रविवारी रात्री असेच सूर्यकांतने ईशिकाला फोन केला. यावेळी त्यांच्यात वाद झाला. त्यामुळे ईशिकाने त्याला सुनावले. मी आता लवकरच दुसरे लग्न करणार आहे, असेही म्हटले. त्यामुळे सूर्यकांत संतापला. दरम्यान, हॉटेलचे काम आटोपून ती मैत्रिणीसह घराकडे निघाली. रात्री ११.३० च्या सुमारास ईशिकाला सूर्यकांतने लक्ष्मीनगरात गाठले. तिच्याशी वाद घालून तिच्यावर चाकूहल्ला चढवला. तिच्या गालावर, हनुवटीवर, पाठ आणि हातावर चाकूच्या जखमा होऊनही आरोपीचा तीव्र प्रतिकार करून ईशिका आणि तिच्या मैत्रिणीने मदतीसाठी आरडाओरड केली. त्यामुळे आजूबाजूची मंडळी धावली. त्यांनी सूर्यकांतला पकडून बेदम चोप दिला. बजाजनगर पोलिसांनाही माहिती कळविली. त्यानुसार, ठाणेदार महेश चव्हाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी पोहचून सूर्यकांतला ताब्यात घेतले. ईशिकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिने दिलेल्या बयाणावरून गुन्हा दाखल करून आरोपी सूर्यकांतला अटक करण्यात आली. त्याला न्यायालयात हजर करून त्याचा पोलिसांनी तीन दिवसांचा पीसीआर मिळवला.

नागरिकांमुळे वाचला जीव

आरोपी ईशिकाच्या हत्येच्या तयारीनेच आला होता. मात्र, वेळीच नागरिकांनी धाव घेऊन आरोपीला पकडल्याने ईशिकाचा जीव वाचला. तीन वर्षांपूर्वी या घटनास्थळापासून काही अंतरावरच सानिका थूगावकर या युवतीवर एकतर्फी प्रेमातून तिच्या प्रियकराने असाच चाकूहल्ला करून तिला ठार मारले होते. ईशिकावरील चाकूहल्ल्याने त्या भागातील सानिका हल्ल्याच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या.

Web Title: Suspicion after love marriage: Attempted murder of divorced wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.