तरुणाचा संशयास्पद मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:08 AM2021-03-21T04:08:57+5:302021-03-21T04:08:57+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क वाडी : आयुध निर्माणी वसाहतीच्या मागे असलेल्या नागलवाडी परिसरातील जंगलात शनिवारी (दि. १९) सकाळी तरुणाचा झाडाला ...

Suspicious death of a young man | तरुणाचा संशयास्पद मृत्यू

तरुणाचा संशयास्पद मृत्यू

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

वाडी : आयुध निर्माणी वसाहतीच्या मागे असलेल्या नागलवाडी परिसरातील जंगलात शनिवारी (दि. १९) सकाळी तरुणाचा झाडाला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. घटनास्थळ आणि मृतदेहाची अवस्था लक्षात घेता, त्या तरुणाच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला जात आहे. त्याने आत्महत्या केली की त्याचा खून करण्यात आला, याबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

आशिष उमरे (२२, रा. अमरनगर, नीलडोह, ता. हिंगणा) असे मृताचे नाव आहे. ताे वाहनचालक म्हणून काम करायचा. ताे गुरुवारी (दि. १८) जेवण केल्यानंतर घराजवळ शतपावली करीत हाेता. त्यातच त्याला हैदराबादला साहित्य घेऊन जाण्यासंदर्भात फाेनवर विचारणा करण्यात आली. त्याने हाेकार देत वाहन काढले. मात्र, कुटुंबीयांनी त्याला जाण्यास मनाई केली. मात्र, लवकर परत येत असल्याचे सांगून ताे निघून गेला, अशी माहिती त्याच्या निकटवर्तीयांनी दिली.

दरम्यान, शुक्रवारी (दि. १९) सकाळी त्याचा मृतदेह नागरवाडी शिवारातील झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. पंचनामा केल्यानंतर मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी नागपूर शहरातील शासकीय रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी वाडी पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, या घटनेचा तपास ठाणेदार प्रदीप सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात वाडी पाेलीस करीत आहेत.

...

हत्या की आत्महत्या?

आशिषचा मृतदेह ज्या झाडाच्या फांदीला लटकलेला हाेता, ते झाड काटेरी असल्याने ताे झाडावर चढला कसा, त्याचे दाेन्ही गुडघे जमिनीला टेकले हाेते. त्यामुळे त्याच्या गळ्यात अडकलेला फास कसा आवळेल, यासह अन्य काही मूलभूत प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत. दुसरीकडे, त्याच्या मृत्यूचे नेमके कारण उत्तरीय तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर कळेल, अशी माहिती ठाणेदार प्रदीप सूर्यवंशी यांनी दिली.

Web Title: Suspicious death of a young man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.