उपराजधानीत पाणी बचतीचा संकल्प
By admin | Published: May 14, 2016 02:50 AM2016-05-14T02:50:01+5:302016-05-14T02:50:01+5:30
‘लोकमत’च्या जलमित्र अभियानाला समाजातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी नागपूर
‘लोकमत’ चे कौतुक : ‘जलमित्र’ अभियानाला हॉटेल्स असोसिएशनचे बळ
नागपूर : ‘लोकमत’च्या जलमित्र अभियानाला समाजातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी नागपूर रेसिडेन्शियल हॉटेल्स असोसिएशनतर्फे एक विशेष बैठक आयोजित करून, त्यात ‘जलमित्र’ अभियानाला पाठिंबा जाहीर केला. लक्ष्मीनगर येथील हॉटेल अशोकामध्ये हा कार्यक्रम पार पडला. यावेळी मंचावर नागपूर रेसिडेन्शियल हॉटेल्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश त्रिवेदी, ‘लोकमत समाचार’ चे प्रोडक्ट हेड मतीन खान, हॉटेल्स असो. चे सचिव तेजिंदरसिंग रेणू, उपाध्यक्ष इंद्रजित बवेजा, डॉ. गणेश गुप्ता व सहसचिव दीपक पांडे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मतीन खान यांनी ‘जलमित्र’ अभियानाची सविस्तर माहिती दिली. यानंतर पाणी बचतीवर सखोल चर्चा करण्यात आली. दरम्यान असोसिएशनच्या काही पदाधिकाऱ्यांनी पाणी बचतीसाठी काही टिप्स् सुद्धा दिल्या. शिवाय काही पदाधिकाऱ्यांनी हॉटेल्समधील बाथरूममध्ये पाणी बचतीच्या संदेशासह पोस्टर्स लावण्याचा सल्ला दिला. यानंतर ‘लोकमत’ ने या अभियानासाठी खास तयार केलेल्या पोस्टर्सचे असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी असो.च्या सर्व पदाधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ च्या अभियानाचे कौतुक करीत, पाणी बचतीचा संकल्प जाहीर केला.
यावेळी हॉटेल्स असोएिशनचे सदस्य विजय चौरसिया, जी. एस. कंवल, राजेश मुलानी, संजय गुप्ता, तरुण मोटवानी, संजय मिश्रा, अजय जयस्वाल, मुर्तजा फिदवी, मनोज शुक्ला, नितीन त्रिवेदी, राजेश किलोर, मधुसूदन त्रिवेदी, हाफिज भाई, शिवचंद दहरेवार, राजकुमार जयस्वाल, अंकित दुआ, आर. के. गुप्ता व एस. एस. मिश्रा उपस्थित होते.