स्वाभिमानीची कर्जाची वरात, मुख्यमंत्र्यांच्या दारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 10:23 PM2019-01-19T22:23:44+5:302019-01-19T22:25:02+5:30

दुष्काळाची केवळ घोषणा न करता हेक्टरी ५० हजार द्या, शेतकऱ्यांचा सातबारा सरसकट कोरा करा, नाफेडमध्ये विकलेल्या तूर, हरभऱ्याचे व्याजासकट पैसे द्या आदी मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना व पक्षातर्फे ‘कर्जाची वरात, मुख्यमंत्र्यांच्या दारात’ काढण्यात आली. पोलिसांनी विधानभवन चौकाजवळ आंदोलनकर्त्यांना अडवून धरले. अखेर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आंदोलनकर्त्यांना सामोरे गेले. त्यांनी पुढील आठवड्यात मुख्यमंत्र्यांसोबत स्वाभिमानीचे नेते, पदाधिकाऱ्यांची नागपुरात बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

Swabhimani's debt Warat at the door of Chief Minister | स्वाभिमानीची कर्जाची वरात, मुख्यमंत्र्यांच्या दारात

स्वाभिमानीची कर्जाची वरात, मुख्यमंत्र्यांच्या दारात

googlenewsNext
ठळक मुद्देविधानभवनाजवळ अडविले : पालकमंत्र्यांनी दिले बैठकीचे आश्वासन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दुष्काळाची केवळ घोषणा न करता हेक्टरी ५० हजार द्या, शेतकऱ्यांचा सातबारा सरसकट कोरा करा, नाफेडमध्ये विकलेल्या तूर, हरभऱ्याचे व्याजासकट पैसे द्या आदी मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना व पक्षातर्फे ‘कर्जाची वरात, मुख्यमंत्र्यांच्या दारात’ काढण्यात आली. पोलिसांनी विधानभवन चौकाजवळ आंदोलनकर्त्यांना अडवून धरले. अखेर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आंदोलनकर्त्यांना सामोरे गेले. त्यांनी पुढील आठवड्यात मुख्यमंत्र्यांसोबत स्वाभिमानीचे नेते, पदाधिकाऱ्यांची नागपुरात बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. 


स्वाभिमानी शेतकरी संघटना व पक्षातर्फे शनिवारी प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांच्या नेतृत्वात यशवंत स्टेडियम येथून कर्जाची वरात, मुख्यमंत्र्यांच्या दारात आंदोलनाला सुरुवात झाली. पंचशील चौक, झांशी राणी चौक, व्हेरायटी चौक, मॉरेस टी पॉईंट या मार्गाने संविधान चौक, विधानभवन चौकात आंदोलनकर्ते पोहोचले. विधानभवन चौकाजवळ पोलिसांनी कडक बंदोबस्त लावून आंदोलनकर्त्यांना अडवून धरले. वरातीत आंदोलनकर्त्यांनी ‘दीडपट हमी भावाचे काय झाले ? दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे, कर्जाची वरात मुख्यमंत्र्यांच्या दारात’ अशा घोषणा देऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी बोलताना स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर म्हणाले, भाजपा सरकारला सत्तेत आणण्यात शेतकऱ्यांचा मोठा वाटा आहे. मोदी सरकारने निवडणुकीपूर्वी खूप आश्वासने दिली. परंतु प्रत्यक्षात एकही आश्वासन पूर्ण केले नाही. शासन ३४ हजार कोटींचे कर्ज माफ केल्याचा डंका पिटवत असल्याचा आरोप त्यांनी केला. सुबोध मोहिते यांनी शासनाने शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी केल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचे सांगितले. यावेळी विधानभवन चौकात स्वाभिमानीच्या शेतकºयांनी प्रतिकात्मक लग्न लावून वरात रामगिरीवर नेण्याचा मानस व्यक्त केला. अखेर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आंदोलनस्थळी आले. त्यांनी आंदोलनकर्त्यांच्या मागण्या समजून घेतल्या. पुढील आठवड्यात स्वाभिमानीचे नेते, पदाधिकाऱ्यांची नागपुरात मुख्यमंत्र्यांशी बैठक बोलविण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर हे आंदोलन आठवडाभरासाठी मागे घेण्यात येत असल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केली. यावेळी स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष देवेंद्र भुयार, नागपूर जिल्हाध्यक्ष दयाल राऊत, अकोला जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर गवळी, काटोलचे तालुकाध्यक्ष अजय घाडगे, प्रकाश पोपडे, दामोधर इंगोले, विशाल गोटे, सुनील जोगदंड, ओम पाटील, गजानन देशमुख, अमोल गोटे यांच्यासह विदर्भातून आलेले स्वाभिमानीचे कार्यकर्ते, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Swabhimani's debt Warat at the door of Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.