स्वच्छ भारत अभियानात जिल्ह्याला ३,८५१ शौचालयाचे टार्गेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:08 AM2021-03-09T04:08:05+5:302021-03-09T04:08:05+5:30
नागपूर : स्वच्छ भारत अभियानाचा दुसरा टप्पा २०२० पासून सुरू झाला आहे. दुसऱ्या टप्प्यातील पाच वर्षांच्या या अभियानात ...
नागपूर : स्वच्छ भारत अभियानाचा दुसरा टप्पा २०२० पासून सुरू झाला आहे. दुसऱ्या टप्प्यातील पाच वर्षांच्या या अभियानात नागपूर जिल्ह्याला २५ हजार शौचालयाचे टार्गेट दिले आहे. त्यातून २०२०-२१ या वर्षात ३,८५१ शौचालयाचे काम पूर्ण करायचे होते. या आर्थिक सत्रातील शेवटचा महिना सुरू असून, अद्यापपर्यंत १२६१ कामे अजूनही शिल्लक आहेत.
विशेष म्हणजे २०१४ ते २०१९ या कालावधीत पार पडलेल्या स्वच्छ भारत अभियानाच्या पहिल्या टप्प्यात नागपूर जिल्ह्यात १ लाख २५ हजार शौचालयाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यानंतर आता स्वच्छ भारत अभियानाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. या दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्याला ३८५१ शौचालय निर्मितीचे उद्दिष्ट देण्यात आले असून, त्यापैकी २,५९० शौचालयांची निर्मितीही झाली आहे. केंद्र सरकारने या अभियानात शौचालयाच्या बांधकामाबरोबरच सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाची जोड दिली आहे. यावर्षीच्या टार्गेटमधील शिल्लक असलेली कामे पूर्णत्वास होण्याच्या मार्गावर आहेत. मार्चच्या अखेरपर्यंत हे टार्गेट नक्कीच पूर्ण होईल, असा विश्वास जि.प.च्या पाणी व स्वच्छता मिशन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल किटे यांनी व्यक्त केला.
- शौचालय न बांधल्यास दंडात्मक कारवाई
१५ मार्च २०२१ पर्यंत शौचालय बांधकाम झाल्यास प्रोत्साहनपर १२ हजार अनुदानाचा लाभ मिळेल. शौचालय बांधकामास सुरुवात न केल्यास दंडात्मक कारवाई करण्यासोबतच शासनाकडून मिळत असलेल्या योजनेचा लाभही मिळणार नाही, असे पत्र बीडीओ, तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांच्या संयुक्त स्वाक्षरीने काढण्यात आले आहे.
- तालुकानिहाय लक्ष्यांक
तालुका एकूण उद्दिष्ट साध्य शिल्लक
भिवापूर ४३८ २३९ १९९
हिंगणा १०२ ६९ ३३
कळमेश्वर ४२८ २४७ १८१
कामठी ३०४ २४० ६४
काटोल १४६ १०४ ४२
कुही २८० १८२ ९८
मौदा ४४६ ३७६ ७०
नागपूर (ग्रा.) १५५ १२७ २८
नरखेड ४३८ २८९ १४९
पारशिवनी ३१५ १६९ १४६
रामटेक ४२५ २५० १७५
सावनेर २१६ १६४ ५२
उमरेड १५८ १३४ २४