स्वप्निल व श्रेयसची लोकमतला सदिच्छा भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 11:07 AM2019-01-30T11:07:28+5:302019-01-30T11:07:53+5:30

गेल्या काही वर्षांत मराठी चित्रपटसृष्टीने दमदार कथानकाची अनुभूती चोखंदळ रसिकांना करून दिली आहे. त्यामुळे हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गजही आता मराठीकडे वळले आहे, असे मत अभिनेते स्वप्निल जोशी यांनी व्यक्त केले.

Swapnil and Shreyas visit the Nagpur Lokmat | स्वप्निल व श्रेयसची लोकमतला सदिच्छा भेट

स्वप्निल व श्रेयसची लोकमतला सदिच्छा भेट

Next
ठळक मुद्देमराठी चित्रपटांचे कथानक दर्जेदार

मंगेश व्यवहारे/अंकिता देशकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मराठी रसिक हे चोखंदळ आहेत. त्यामुळे मराठी चित्रपट केवळ अभिनेते अथवा अभिनेत्रीवर चालत नाही. मराठी रसिकांना आनंद देण्यासाठी दमदार कथानकाची आवश्यकता आहे. गेल्या काही वर्षांत मराठी चित्रपटसृष्टीने दमदार कथानकाची अनुभूती चोखंदळ रसिकांना करून दिली आहे. त्यामुळे हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गजही आता मराठीकडे वळले आहे, असे मत अभिनेते स्वप्निल जोशी यांनी व्यक्त केले.
दिग्दर्शक श्रेयस जाधव यांच्या ‘मी पण सचिन’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ते नागपुरात आले असता त्यांनी लोकमतला सदिच्छा भेट दिली. खेळ या क्षेत्रावर मराठीत ‘मी पण सचिन’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट सचिन तेंडुलकर यांच्या चाहत्यावर आधारित आहे. त्या चाहत्याचे स्वप्न लॉर्डस्च्या मैदानावर खेळण्याचे आहे. या फॅन्सचा प्रवास आणि त्यात आलेले संघर्ष आणि आनंदाचे क्षण यावर तो चित्रपट चित्रित केला आहे. खेळावर मराठीतील हा पहिलाच चित्रपट असल्याचे स्वप्निल म्हणाले. चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेल्या स्वप्निलने चित्रपटासाठी विशेष मेहनत घेतली आहे. त्यासाठी त्याने १३ किलो वजन कमी केले आहे. मराठी आणि हिंदी चित्रपटाची तुलना कशी कराल, याविषयी स्वप्निल म्हणाले की, केवळ चित्रपटाचे बजेट सोडल्यास काहीच फरक नसतो. मराठी चित्रपट हा कमी बजेटमध्ये बनत असल्याने सोबतच चांगले कथानक पुढे येत असल्याने हिंदी चित्रपटातील दिग्दर्शक, अभिनेते आता मराठी चित्रपटात रस घेऊ लागले आहेत.
‘मी पण सचिन’ या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक असलेले श्रेयस जाधव हे मूळचे नागपूरचे आहेत. त्यांनी व्यावसायिक क्रिकेट खेळले आहे. सध्या ते चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत. क्रिकेटची आवड असल्यामुळे त्यांनी या चित्रपटाची निर्मिती केली. पहिलाच चित्रपट असतानाही स्वप्निलसारख्या दर्जेदार कलावंतांनी त्यात मुख्य भूमिका साकारल्याचा आनंद श्रेयसने व्यक्त केला. पुण्यातील भोर येथे चित्रपटाचे शुटींग झाले आहे. २० मिनिटांची क्रिकेट मॅच यात दाखविली आहे.
१ फेब्रुवारीला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे डायलॉग अजिता काळे यांनी लिहिले आहे. चित्रपटात स्वप्निल जोशी यांच्यासोबत अभिजित खांडेकर, प्रियदर्शन जाधव, कल्याणी मुळे, अविनाश नारकर, अनुजा साठे आणि सुहिता थेट्टे आहे.

Web Title: Swapnil and Shreyas visit the Nagpur Lokmat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.