स्वारगेट - कात्रज मेट्रोचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवणार, उदय सामंत यांची माहिती

By कमलेश वानखेडे | Published: December 20, 2023 05:55 PM2023-12-20T17:55:52+5:302023-12-20T17:56:19+5:30

आ. भीमराव तापकीर यांनी लक्षवेधी सूचना मांडत पुणे मेट्रो टप्पा १ आणि २ मध्ये स्थानकाची वाढ करण्याकडे सरकारचे लक्ष वेधले.

Swargate-Katraj Metro proposal will be sent to the Centre, Uday Samant informed | स्वारगेट - कात्रज मेट्रोचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवणार, उदय सामंत यांची माहिती

स्वारगेट - कात्रज मेट्रोचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवणार, उदय सामंत यांची माहिती

नागपूर : : पुणे शहरातील स्वारगेट ते कात्रज भूमिगत मेट्रो प्रस्तावित आहे. या प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मान्यता घेऊन केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवला जाईल, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले.

आ. भीमराव तापकीर यांनी लक्षवेधी सूचना मांडत पुणे मेट्रो टप्पा १ आणि २ मध्ये स्थानकाची वाढ करण्याकडे सरकारचे लक्ष वेधले. यावर उत्तर देताना उदय सामंत म्हणाले, स्वारगेट ते कात्रज मेट्रोचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे गेल्यानंतर राज्य शासन त्याचा पाठपुरावा करून मंजूरी घेईल. खडकवासला ते खडारी हा २५.६५ किमीच्या मेट्रो मार्गाचा डीपीआर राज्य शासनाकडे सादर झालेला आहे. तो देखील मंत्रिमंडळाची मान्यता घेऊन केंद्र शासनाकडे पाठवला जाईल. 

या मेट्रोचे शेवटचे स्टेशन खडकवासला धरणापर्यंत असावे अशी मागणी केलेली आहे. त्याची देखील संयुक्त पाहणी झालेली आहे. तो प्रस्ताव फिजिबिलिटी रिपोर्टसह शासनाकडे सादर केलेला असून राज्य शासन त्यावर निर्णय घेईल.

Web Title: Swargate-Katraj Metro proposal will be sent to the Centre, Uday Samant informed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.