पिपळा परिसरात चाेरट्यांचा धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:08 AM2021-03-28T04:08:34+5:302021-03-28T04:08:34+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क पिपळा (डाकबंगला) : काेराेना संक्रमणामुळे एकीकडे नागरिक हैराण झाले आहेत तर दुसरीकडे, चाेरट्यांनी सावनेर तालुक्यातील पिपळा ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
पिपळा (डाकबंगला) : काेराेना संक्रमणामुळे एकीकडे नागरिक हैराण झाले आहेत तर दुसरीकडे, चाेरट्यांनी सावनेर तालुक्यातील पिपळा (डाकबंगला) परिसरात धुमाकूळ घातला आहे. या चाेरट्यांनी आठवडाभरात तीन वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या चाेऱ्यांमध्ये एकूण ५९ हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला.
चाेरट्यांनी साेमवारी (दि. २२) मध्यरात्री मुख्य मार्गालगत असलेल्या तुकाराम ठाकरे, रा. पिपळा (डाकबंगला), ता. सावनेर यांच्या घराच्या दाराची कडी ताेडून आत प्रवेश केला. यात त्यांनी तीन बकऱ्या चाेरून नेल्या. त्या तिन्ही बकऱ्यांची एकूण किंमत २५ हजार रुपये असल्याचे तुकाराम ठाकरे यांनी पाेलिसांना सांगितले. त्यानंतर चाेरट्यांनी गुरुवारी (दि. २५) दुपारी पिपळा (डाकबंगला) येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या वर्गखाेलीमध्ये प्रवेश केला. यात त्यांनी शिक्षिका मंगला लांडे व प्रतिभा जुनघरे यांच्या बॅगमधील दाेन माेबाइल हॅण्डसेट चाेरून नेले. या दाेन्ही हॅण्डसेटची एकूण किंमत २४ हजार रुपये असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, गुरुवारी (दि.२५) मध्यरात्री चाेरट्यांनी पिपळा (डाकबंगला) येथील विशाल पान पॅलेसला लक्ष्य केले. यात चाेरट्यांनी त्या पान पॅलेसचे शटर वाकवून आत प्रवेश केला आणि आतील तीन हजार रुपये राेख व सात हजार रुपये किमतीचे विविध साहित्य असा एकूण १० हजार रुपयांचा मुद्देमाल चाेरून नेला. या तिन्ही घटनांमध्ये खापरखेडा (ता. सावनेर) पाेलिसांनी अज्ञात आराेपींविरुद्ध गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. दुसरीकडे, वाढत्या चाेरीच्या घटना लक्षात घेता पाेलिसांनी या भागात रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणीही स्थानिक नागरिकांनी केली आहे.