बाजारात गोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 12:43 AM2017-10-17T00:43:53+5:302017-10-17T00:44:16+5:30

Sweeten in the market | बाजारात गोडवा

बाजारात गोडवा

Next
ठळक मुद्देसराफा व इलेक्ट्रॉनिक्स बाजारपेठा सज्ज, ग्राहकांत चैतन्य

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : धनत्रयोदशी म्हणजे सोने खरेदीचा मुहूर्त. या मुहूर्तावर उपराजधानीतील बाजारात गोडवा आहे. ग्राहकांच्या आवडीनुसार सर्वच शोरूममध्ये अनोख्या व आकर्षक डिझाईनचे दागिने प्रदर्शित केले असून सोने खरेदीसाठी झुंबड राहणार आहे. या शिवाय इलेक्ट्रॉनिक्स बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात उत्साह राहण्याची शक्यता आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपन्यांनी ग्राहकोपयोगी योजना दाखल केल्या आहेत. नागरिकांमध्ये चैतन्य आहे. या शुभ दिवशी सराफा आणि इलेक्ट्रॉनिक्स बाजारात कोट्यवधींची उलाढाल होण्याची शक्यता आहे.
सोन्याचे दर स्थिर असल्यामुळे अनेकांचा दिवाळीनंतरच्या लग्नसराईसाठी दागिन्यांच्या खरेदीवर भर राहणार आहे. या दिवशी गुंतवणूकदार सोने आणि चांदीची नाणी व भांडे खरेदी करण्याची शक्यता आहे. मंदीची चर्चा सुरू असताना सोन्याचांदीच्या बाजारांत मात्र तेजीचे उत्साही वातावरण राहणार आहे. सराफांसाठी दिवाळी चांगलीच शुभ ठरणार आहे.
आॅटोमोबाईल बाजारात राहणार गर्दी
दसºयाला दुचाकी आणि चारचाकी गाड्या खरेदीची प्रथा आहे. पण अनेकजण धनत्रयोदशीला वाहन खरेदी करतात. या दिवशी आॅटोमोबाईल मार्केटमध्ये उत्साह आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नामांकित कंपन्यांनी वस्तू खरेदीवर आकर्षक वस्तू देण्याची आॅफर आणली आहे. यासोबतच वित्तीय संस्थांच्या शून्य टक्के व्याजदराच्या योजना असल्यामुळे या दिवशी लोकांची खरेदी वाढणार आहे.
रेडिमेड गारमेंटच्या दुकानात गर्दी
लोकांनी कपड्यांची खरेदी उशिरा सुरू केली तरीही गेल्या चार दिवसांपासून या बाजारपेठेत उत्साह आहे. नवीन ट्रेन्डची खरेदी वाढली असून कोट्यवधींच्या उलाढालीची शक्यता आहे.
आॅनलाईन खरेदीवर भर
सध्या तरुणांमध्ये आॅनलाईन खरेदीची जास्त क्रेझ आहे. त्यातच दिवाळीत आॅनलाईन साईटसकडून अनेक वस्तूंवर आॅफर देण्यात आल्याने अनेकांनी मॉल किंवा शोरूम मध्ये न जाता आॅनलाईन खरेदी करण्यावर जास्त भर आहे. यामध्ये मोबाईल आणि लॅपटॉपला जास्त मागणी होती. धनत्रयोदशीनिमित्त विविध ठिकाणी भगवान धन्वंतरीचे विधिवत पूजन करण्यात येणार आहे. याशिवाय फराळ, आकाशकंदिल, सजावटीचे साहित्य, कपडे खरेदीसाठी दुकानांमध्ये गर्दी राहील, असे व्यापाºयांनी सांगितले.
इलेक्ट्रॉनिक्स बाजार जोमात
धनत्रयोदशीला इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंला जास्त मागणी राहणार आहे. या दिवशी इलेक्ट्रॉनिक्स बाजाराचा आलेख उंचावला आहे. फ्रिज, एलईडी टीव्ही आणि वॉशिंग मशीनला मागणी वाढली असून नागपुरात तब्बल १० कोटींवर उलाढाल झाल्याची शक्यता विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे. तसेच मोबाईल मार्केटमध्ये मोठी उलाढाल होण्याची शक्यता आहे.

Web Title: Sweeten in the market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.