मिठाई, मेव्याच्या बाजारात गोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 12:48 AM2017-10-10T00:48:11+5:302017-10-10T00:48:27+5:30

दिवाळी जवळ आलेली असताना एकमेकांना शुभेच्छा देण्याशिवाय भेटवस्तू देणे सुरू झाले आहे.

Sweetness in the sweet market | मिठाई, मेव्याच्या बाजारात गोडवा

मिठाई, मेव्याच्या बाजारात गोडवा

Next
ठळक मुद्देदिवाळीनिमित्त वाढली पसंती : परराज्यातूनही मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दिवाळी जवळ आलेली असताना एकमेकांना शुभेच्छा देण्याशिवाय भेटवस्तू देणे सुरू झाले आहे. आपल्या बजेटमध्ये चांगली भेटवस्तू देण्यासाठी नागरिक मिठाई, मेव्यांना पसंतीक्रम देत आहेत. बाजारात मिठाई, मेव्याची मागणी पाहता आकर्षक पॅकिंगमध्ये वजन आणि किमतीच्या आधारे त्यांना तयार करण्यात येत आहे. माता लक्ष्मी, श्रीगणेश, स्वस्तिक, ओम आदी डिझाईनचे बॉक्स तयार करून त्यात मिठाई, मेवा सुंदर पद्धतीने सजवून उपलब्ध करून देण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरात जवळपास १८० दुकाने आहेत. येथे पॅकिंगमध्ये मिठाई उपलब्ध करून देण्यात येत आहे. नागपूरशिवाय विदर्भ, मराठवाडा, खान्देश, छत्तीसगड, मध्य प्रदेशातही त्याला विशेष मागणी आहे. दिल्ली, मुंबई, इराक-इराणमधूनही शहरातून मिठाई मागविण्यात येत आहे.

२०० ते ३ हजारापर्यंत आहेत किमती
ग्राहकांची मागणी पाहून २०० ग्रॅम ते २ किलोपर्यंतचे मिठाईचे पॅकेट उपलब्ध करून देण्यात येत आहे. मिठाईच्या किमतीही वजनाशी मिळत्याजुळत्या आहेत. मिठाईच्या दुकानात हे बॉक्स २०० रुपये ते ३ हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. यात काजू, बदाम, अक्रोड, अंजीर, किसमिस, ताल मखाना, जर्दाळू, पिस्ता आदींचा समावेश आहे.
नागरिकांची वाढतेय मागणी
दिवाळीच्या उत्साहात प्रत्येक जण एकमेकांना शुभेच्छा देतो. शुभेच्छांसोबत भेटवस्तू देण्याचीही परंपरा आहे. अनेक नागरिक असे आहेत जे दुसºया शहरात राहणाºया आपल्या चाहत्यांना भेटवस्तू पाठवू इच्छितात. मिठाईच्या तुलनेत मेवा सहा महिन्यापर्यंत टीकत असल्यामुळे अनेक नागरिक त्याला पसंती देत आहेत, असे व्यावसायिक अतुल कोटेचा यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

Web Title: Sweetness in the sweet market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.