सखी संक्रांती मेळाव्यात परंपरेचा गोडवा
By admin | Published: February 2, 2016 02:51 AM2016-02-02T02:51:24+5:302016-02-02T02:51:24+5:30
जीवनातील कडवटपणा नष्ट करण्याच्या उद्देशाने आयोजित संक्रांत मेळावा परंपरेच्या गोडव्याने रंगला.
कलर्स व लोकमत सखी मंचचा उपक्रम
नागपूर : जीवनातील कडवटपणा नष्ट करण्याच्या उद्देशाने आयोजित संक्रांत मेळावा परंपरेच्या गोडव्याने रंगला. हळद-कुंकू, तीळगूळ, वाण, हलव्याचे दागिने, विविध स्पर्धा, स्टॉल्स आणि मनोरंजनामुळे हा मेळावा स्नेहगुणाचा ठरला. सखींचा ‘फॅशन शो’मधून पारंपरिकता आणि आधुनिकतेचा सुरेख संगम रसिकांनी अनुभवला. निमित्त होते कलर्स व लोकमत सखी मंच प्रस्तुत सखी संक्रांत मेळाव्याचे. सुभाष मार्गावरील गीता मंदिरात आयोजित या मेळाव्याला सखींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
‘कलर्स चॅनल’ला महिलांची पहिली पसंती मिळत आहे. या चॅनलच्यावतीने सखी मंच सदस्यांसाठी आपल्या परंपरा, संस्कृती जोपासण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. एकदा पुन्हा नवीन विषय आणि नवीन कलावंतांसोबत ‘कलर्स’वर नवी मालिका ‘कृष्णदासी’ रसिकांच्या सेवेत प्रसारित होत आहे. देवदासी प्रथेवर आधारित या मालिकेत कुमुदिनी तुलसी आणि आराध्या नामक स्त्री अभिनेत्री अधिकार आणि समानतेसाठी संघर्ष करताना दिसून येणार आहे. ही मालिका रात्री १०.३० वाजता ‘कलर्स चॅनल’वर सुरू आहे.
बऱ्याच कालावधीपासून चालू असलेली देवदासी ही प्रथा आजच्या पिढीच्या नजरेतून मार्मिक रूपात सादर करण्याचा प्रयत्न ‘कलर्स चॅनल’ने केला आहे. कलर्सच्यावतीने सखींसाठी अनेक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. यात भजन स्पर्धेतील विजेत्यांना कलर्सच्यावतीने चांदीच्या कुंकवाची डबी भेटवस्तूच्या रूपात देण्यात आली. यावेळी डागा ले-आऊटच्या भक्तिरस भजन मंडळाने ‘कृष्णजीची भक्ती’ हे भजन सादर केले. संक्रांत मेळाव्याप्रसंगी पारंपरिक उखाणे स्पर्धा रंगली. ‘होम मिनिस्टर’सखींमधील प्रश्नोत्तरी स्पर्धेत विजेत्या सखीला पुरस्काराच्या स्वरूपात पैठणी देण्यात आली. या मेळाव्याचे वैशिष्ट्य सखींचे ‘फॅशन शो’ ठरले.
यात सहभागी सखी काळ्या साडीमध्ये हलव्याचे दागिने घालून रॅम्पवर उतरल्या होत्या. सभागृहाच्या बाहेर विविध स्टॉल्स लावण्यात आले होते. कार्यक्रमात सहभागी सखींना हळद-कुंकू, तीळगूळ आणि वाण देण्यात आले. निकालस अलंकारच्यावतीने चांदीचे पाणी चढविलेले लक्ष्मीचे नाणे सखींना वाणाच्या रूपात देण्यात आले. विविध स्पर्धेतील विजेत्यांना निशा हर्बलच्यावतीने ‘गिफ्ट हॅम्पर’ देण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून निशा हर्बलचे सुनील खोटेले व श्रीकांत तुंगार, मुलतानी प्रोडक्शनचे रूपेश भोरकर, आर्ट आॅफ लिव्हिंगच्या अर्यना भारती आणि शीतल महाजन उपस्थित होते. परीक्षक म्हणून वैशाली देशपांडे, ललिता गुलईकर होत्या. संचालन नेहा जोशी यांनी केले.(प्रतिनिधी)
कॅन्सर व त्वचा रोगावर मार्गदर्शन
कॅन्सर रोग विशेषज्ञ डॉ. सौरभ प्रसाद यांनी कॅन्सरचे वाढते धोके, कॅन्सरची लक्षणे, त्याचे विविध प्रकार, उपचाराची प्रक्रिया आणि विशेष देखभाल यावर मार्गदर्शन केले. डॉ. अंशुल जैन यांनी प्रदूषणामुळे वाढत असलेल्या त्वचा रोगाची माहिती दिली. यावेळी त्यांनी आढळून येणाऱ्या नव्या त्वचा रोगांवरही मार्गदर्शन केले.
स्पर्धेतील विजेते
उखाणे स्पर्धा : प्रथम- संगीता पिसाड, द्वितीय- दिव्या राघोर्ते, तृतीय ऋद्धी ठाकूर
फॅशन शो : प्रथम- पायल धापोडकर, द्वितीय- शुभांगी लांजेवार, तृतीय ज्योत्स्ना नगरारे
व्यंजन स्पर्धा : प्रथम माधुरी राऊत, द्वितीय-हर्षाली काईलकर, तृतीय- प्रियंका राठी
होम मिनिस्टर स्पर्धा : पैठणी विजेता माया सावरकर आणि शीला शेटे.
कृष्ण भजन स्पर्धा : रोशनी शेगावकर, चित्रा कांबळे, शांता हुडिया, पूजा सालीगंजेवाल, नंदा गुप्ता, आशा खत्री, निकुंज भटनागर, राधा चौरसिया, शोभा निमजे, सृष्टी नागपुरे.