वय ५०; सर्दी-पडसेकडे दुर्लक्ष नको, असू शकतो 'स्वाईन फ्लू'; दोन रुग्णांचा मृत्यू
By सुमेध वाघमार | Published: October 6, 2023 01:04 PM2023-10-06T13:04:58+5:302023-10-06T13:05:15+5:30
सहा मृत्यूची नोंद : तीन महिला व तीन पुरुषांचा समावेश
नागपूर : ताप, सर्दी-पडसे असेल आणि तुमचे वय पन्नाशीवर असेल तर या लक्षणांकडे दुर्लक्ष नको. कारण, स्वाईन फ्लूने आणखी दोन रुग्णांचे बळी घेतले असून मृतांची संख्या सहा झाली. हे सर्व रुग्ण पन्नाशी गाठलेले होते.
मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्या कक्षात नुकतीच स्वाईन फ्लू आढावा बैठक पार पडली. समितीचे अध्यक्ष मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, समितीचे सचिव वैद्यकीय अधिकारी (साथरोग) डॉ. गोवर्धन नवखरे, मेयोचे डॉ. रविंद्र खडसे, डॉ. अभिनव वानखेडे, जिल्हा परिषद नागपूरचे जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. विनोद बीटपल्लीवार यांच्यासह खाजगी रुग्णालयाचे प्रतिनिधी प्रमुख्याने उपस्थित होते.
-मृतांमध्ये मध्यप्रदेश व नागपुरातील रुग्ण
या बैठकीमध्ये स्वाईन फ्लूने मृत्यू झालेल्या दोन रुग्णांची माहिती ठेवून त्याचे विश्लेषण करण्यात आले. मध्यप्रदेशमधील रुग्णाचा मृत्यू स्वाईन फ्लूने झाल्याचे तज्ज्ञाने स्पष्ट केले. तर, दुसरा रुग्ण हा नागपुरातील होता. त्याला स्वाईन फ्लूसोबतच हृदय रोग, संधीवात व थॅलेसेमीया या सहव्याधी असल्याने मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले.
-१० संशयितांपैकी ६ मृत्यू
स्वाईन फ्लू संशयित १० मृत्यूची प्रकरणे बैठकीत ठेवण्यात आली. यात जानेवारी ते आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. या सर्वांचे वय ५०व त्यापुढील होते. तीन महिला व तीन पुरुषांचा यात समावेश होता.
-सहव्याधी असलेल्यांनी फ्लूकडे लक्ष द्या
डॉ. गोवर्धन नवखरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले, स्वाईन फ्लूचे आतापर्यंत सहा मृत्यू झाले तरी घाबरण्याचे कारण नाही. परंतु ज्यांचे वय ५० व त्यापुढील आहे, ज्यांना सहव्याधी आहेत त्यांनी फ्लू सदृश्य लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. प्रतिबंध करण्यासाठी इन्फल्युएंझां ए लसीकरणाच्या डोस घ्यावा. वैयक्तिक स्वस्छता जसे, वांरवार हात धुणे, सॅनीटायझरने हाथ निर्जतुंक करणे, खोकलताना, शिंकताना तोडावर रुमाल धरणे, वारंवार स्पर्श होणाºया वस्तु, जागा निंर्जतूक करणे, गर्दीत जाणे टाळणे व मास्क वापरणे गरजेचे आहे.