नागपुरात  स्वाईन फ्लू वाढतोय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 11:56 PM2018-08-28T23:56:37+5:302018-08-28T23:57:53+5:30

डेंग्यू, स्क्रब टायफसने डोके वर काढले असताना स्वाईन फ्लूच्या रुग्णांतही वाढ होताना दिसून येत आहे. गेल्या दोन दिवसात स्वाईन फ्लूचे आणखी दोन रुग्ण पॉझिटीव्ह आले असून रुग्णांची संख्या १० वर पोहचली आहे. हे दोन्ही रुग्ण वेगवेगळ्या खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे.

Swine flu is growing in Nagpur! | नागपुरात  स्वाईन फ्लू वाढतोय!

नागपुरात  स्वाईन फ्लू वाढतोय!

Next
ठळक मुद्देआणखी दोन रुग्णाचे निदान : रुग्णांची संख्या १०, मृत्यू २

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डेंग्यू, स्क्रब टायफसने डोके वर काढले असताना स्वाईन फ्लूच्या रुग्णांतही वाढ होताना दिसून येत आहे. गेल्या दोन दिवसात स्वाईन फ्लूचे आणखी दोन रुग्ण पॉझिटीव्ह आले असून रुग्णांची संख्या १० वर पोहचली आहे. हे दोन्ही रुग्ण वेगवेगळ्या खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे.
वातावरणातील सध्याचे बदल स्वाईन फ्लूसाठी पोषक ठरत आहे. यामुळे रुग्णांची संख्या वाढणार असल्याची शक्यता डॉक्टर वर्तवित आहे. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत आतापर्यंत कमी रुग्ण आढळून आले आहेत. २५ आॅगस्ट रोजी पहिल्यांदाच एक वर्षीय चिमुकल्याची स्वाईन फ्लू रुग्ण म्हणून नोंद झाली. त्यानंतर आता पुन्हा दोन रुग्ण पॉझिटीव्ह आले आहेत. दोन्ही रुग्ण पुरुष असून दोन वेगवेगळ्या खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. डॉक्टरांच्या मते या रुग्णाची प्रकृती स्थिर असून उपचाराला प्रतिसाद देत आहे. सध्या रुग्णांची संख्या १० झाली असून मध्य प्रदेशातील व काटोलमधील प्रत्येकी एक रुग्णाच्या मृत्यूची नोंद आहे.

Web Title: Swine flu is growing in Nagpur!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.