'त्या' रुग्णाची लक्षणे होती कोरोनाशी मिळतीजुळती.. पण झाला होता 'हा' आजार..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 09:21 AM2021-05-31T09:21:22+5:302021-05-31T09:21:44+5:30

अचानक ताप आला, नक्कीच कोरोना असेल घरच्यांना सर्वांनाच वाटले. यामुळे सुरूवातील कोरोनाची 'रॅपीड अँटिजेन' आणि नंतर 'आरटीपीसीआर' चाचणी केली. परंतु दोन्ही चाचण्या 'निगेटिव्ह' आल्या. डॉक्टरांनी 'सिटी स्कॅन'ही केले. तेही सामान्य होते. अखेर...

The symptoms of that patient were similar to Corona but finally.. | 'त्या' रुग्णाची लक्षणे होती कोरोनाशी मिळतीजुळती.. पण झाला होता 'हा' आजार..

'त्या' रुग्णाची लक्षणे होती कोरोनाशी मिळतीजुळती.. पण झाला होता 'हा' आजार..

Next
ठळक मुद्दे१५ हजारापर्यंत प्लेटलेट आल्या होत्या खाली


लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अचानक ताप आला, नक्कीच कोरोना असेल घरच्यांना सर्वांनाच वाटले. यामुळे सुरूवातील कोरोनाची 'रॅपीड अँटिजेन' आणि नंतर 'आरटीपीसीआर' चाचणी केली. परंतु दोन्ही चाचण्या 'निगेटिव्ह' आल्या. डॉक्टरांनी 'सिटी स्कॅन'ही केले. तेही सामान्य होते. अखेर डेंग्यूची चाचणी केली. ती पॉझिटिव्ह आली. या दरम्यान रक्तातील प्लेटलेट कमी होऊन १५ हजारापर्यंत आल्या. परंतु डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले. मी सुद्धा पॉझिटिव्ह विचार करीत औषधोपचाराला समोर गेल्याने सात दिवसांत बरा होऊन रुग्णालयातून घरी परतलो.
नागपुरातील ३८ वर्षीय सुनील 'लोकमत'शी बोलत होता. सध्या कुठलेही आजाराची लक्षणे कोरोनाची जोडून पाहिले जात असल्याने उपचारात उशीर होत असल्याचे चित्र आहे. परंतु डॉक्टरांचा अनुभव व तातडीने आजाराचे निदान व उपचारामुळे रुग्ण बरे होत आहेत. ह्यसुनीलह्णवर उपचार करणारे किंग्जवे हॉस्पिटलचे 'क्रिटीकल केअर फिजीशियन' डॉ. अब्जल शेख यांनी सांगितले, सुनील जेव्हा रुग्णालयात आला तेव्हा त्याला १०२ ते १०४ दरम्यान ताप होता. सलग तीन तिवस तो तापाने फणफणत होता. त्याच्या कोरोनाच आणि सिटी स्कॅनचा रिपोर्ट निगेटिव्ह होता. यामुळे डेंग्यूसह इतर आजाराची तपासणी केली. यात डेंग्यू पॉझिटिव्ह आला. उपचाराला सुरूवात झाली. परंतु त्याचा रक्तातील प्लेटलेट अडीच लाखाहून १५ हजारावर आले होते. स्थिती गंभीर झाली होती. परंतु अनुभवाच्या बळावर केलेला औषधोपचार व सुनीलने दिलेला प्रतिसाद यामुळे पाच दिवसांतच त्याचा प्लेटलेट वाढून ५० हजारांवर गेल्या. यामुळे सात दिवसात त्याला सुटी देण्यात आली.

-डेंग्यूचा प्रादूर्भाव व तिसऱ्या लाटेचा अंदाजामुळे अधिक काळजी घेण्याचे आवाहन

पुढील महिने पावसाचे आहेत. पाऊस म्हटले की, जागोजागी पाणी साचून डेंग्यूला कारणीभूत असलेले 'एडीस' डासाचा प्रादूर्भाव. विशेष म्हणजे, सुरूवातीच्या दिवसातही उखाडा राहत असल्यान लोकांचे कुलर सुरू असतात. परिणामी या डासांच्या उत्पत्तीला मदत होते. सध्या डेंग्यूवर स्पष्ट उपचार किंवा अँटीबायोटिक किंवा अँटीव्हायरल औषध नाही. यातच कोरोनाचा तिसºया लाटेचा अंदा वर्तविला जात असल्याने अधिक काळजी घेण्याचे आवाहनही डॉ. अब्जल शेख यांनी केले आहे.

 

Web Title: The symptoms of that patient were similar to Corona but finally..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.