ओमायक्रॉनचा व्हेरिएंट रोखण्यासाठी नागपुरातील यंत्रणा सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2021 08:39 PM2021-12-21T20:39:51+5:302021-12-21T20:40:20+5:30

Nagpur News ओमायक्रॉन या कोरोनाच्या नवा व्हेरिएंटचा संभाव्य धोका लक्षात घेऊन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी मंगळवारी दिले.

The system in Nagpur is ready to block the variant of Omycron | ओमायक्रॉनचा व्हेरिएंट रोखण्यासाठी नागपुरातील यंत्रणा सज्ज

ओमायक्रॉनचा व्हेरिएंट रोखण्यासाठी नागपुरातील यंत्रणा सज्ज

googlenewsNext
ठळक मुद्देकोविड प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोर पालन करा

नागपूर : ओमायक्रॉन या कोरोनाच्या नवा व्हेरिएंटचे राज्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. संभाव्य धोका लक्षात घेऊन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी मंगळवारी दिले. त्यांनी लसीकरणाची गती वाढविण्याचे व १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या सूचनाही दिल्या.

ओमायक्रॉन व्हेरिएंटवरील उपाययोजना व प्रशासनाचे नियोजन यासंदर्भात लवंगारे-वर्मा यांनी विभागाचा आढावा घेतला. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी नागपूरच्या जिल्हाधिकारी आर. विमला, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्यासह वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीचे जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे तसेच उपायुक्त (महसूल) मिलिंद साळवे, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता, मेयोच्या अधिष्ठाता डॉ. भावना सोनवणे आदी उपस्थित होते.

- विदेशातून येणाऱ्यांची कोरोना तपासणी अनिवार्य

ओमायक्रॉन व्हेरिएंटचे ३० देशात रुग्ण वाढत आहेत. भारतात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. यामुळे विदेशातून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची कोरोना तपासणी अनिवार्य करण्याचा सूचना विभागीय आयुक्तांनी दिल्या.

- कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवा

सर्वच ठिकाणी कोरोना चाचण्यांची संख्या कमी झाली आहे. यामुळे प्रत्येक संशयित रुग्णांची तपासणी करण्याचे, रेमडेसिविर,ऑक्सिजन सिलेंडर, व्हेंटिलेटर्स तसेच बालकांना लागणारे आय.व्ही. फ्ल्यूड्सचा पुरेसा साठा आरोग्य विभागाने उपलब्ध ठेवावा. आतापासूनच सर्व साधनसामग्री व आवश्यक साधनांचे योग्य नियोजन करण्याचे निर्देशही विभागीय आयुक्तांनी दिले.

- बालरोग तज्ज्ञांची टास्क फोर्स

ओमायक्रॉन व्हेरिएंटचा धोका टाळण्यासाठी बालरोग तज्ज्ञांचा समावेश असलेला टास्क फोर्स त्वरित गठित करावा व या टास्क फोर्समार्फत जिल्ह्यातील बालरोग तज्ज्ञांना मार्गदर्शन व उपचार पद्धतीबाबत माहिती द्यावी, अशा सूचनाही लवंगारे-वर्मा यांनी दिल्या.

- औषधी व वैद्यकीय उपकरणांची खरेदी करा

आरटीपीसीआर लॅबची श्रेणी वाढविणे, आयसीयूचे बळकटीकरण तसेच लहान मुलांसाठी कक्ष उभारण्यासाठी ‘ईसीआरपी-२’अंतर्गत निधी मंजूर करण्यात आला आहे. कोरोनासाठी लागणारे आवश्यक साहित्य, औषधी, वैद्यकीय उपकरणे आदींच्या खरेदीसाठी प्राप्त निधीचा उपयोग करावा. प्रत्येक जिल्ह्याने फायर ऑडिटचे कामकाज पूर्ण करावे. कोरोनावरील उपाययोजनांसंदर्भात आढावा घेण्यासाठी दर मंगळवारी विभागीय बैठकीचे आयोजन करण्यात येईल, असेही लवंगारे-वर्मा यांनी सांगितले.

Web Title: The system in Nagpur is ready to block the variant of Omycron

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.