तांत्रिक अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 02:37 AM2017-07-31T02:37:28+5:302017-07-31T02:37:28+5:30

मुंबई विद्यापीठाच्या उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकन प्रक्रियेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने मदतीचा हात दिला आहे.

taantaraika-adathalaa | तांत्रिक अडथळा

तांत्रिक अडथळा

Next

नागपूर : मुंबई विद्यापीठाच्या उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकन प्रक्रियेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने मदतीचा हात दिला आहे. मात्र दोन्ही विद्यापीठांमधील मूल्यांकन ‘सॉफ्टवेअर’मधील तफावतीमुळे देखील तांत्रिक अडथळे येत आहेत.
कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी मदतीचा हात दिला. धनवटे नॅशनल कॉलेजचे प्राचार्य डॉ.बबन तायवाडे यांच्या नेतृत्वात महाविद्यालयात ‘आॅनस्क्रीन’ मूल्यांकनाला सुरुवात झाली. मात्र आतापर्यंत मूल्यांकन झालेल्या उत्तरपत्रिकांनी सव्वा तीन हजारांचा आकडादेखील गाठलेला नाही. मूल्यांकन केंद्रावर संथ इंटरनेटमुळे अडथळे येत आहेत. शिवाय मुंबई विद्यापीठ व नागपूर विद्यापीठातील ‘आॅनस्क्रीन’ मूल्यांकनाच्या ‘सॉफ्टवेअर’मध्ये फरक आहे. त्यामुळे तांत्रिक अडचणी येत आहेत.

Web Title: taantaraika-adathalaa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.