टेबल टेनिसचे रेफरी मोपकर जपानला रवाना होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:07 AM2021-07-22T04:07:21+5:302021-07-22T04:07:21+5:30

नागपूर : ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणे ही माझ्या जीवनातील मोठी उपलब्धी आहे. ऑलिम्पिकबाबत मी खूप उत्साही आहे. ...

Table tennis referee Mopkar to leave for Japan | टेबल टेनिसचे रेफरी मोपकर जपानला रवाना होणार

टेबल टेनिसचे रेफरी मोपकर जपानला रवाना होणार

Next

नागपूर : ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणे ही माझ्या जीवनातील मोठी उपलब्धी आहे. ऑलिम्पिकबाबत मी खूप उत्साही आहे. परंतु कोरोनामुळे चिंता व्यक्त होत आहे, असे टोकियो ऑलिम्पिकमध्ये टेबल टेनिसचे रेफरी म्हणून सहभागी होत असलेले मंगेश मोपकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

मंगेश हे टेबल टेनिस रेफरी म्हणून टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होत असलेले एकमेव भारतीय आहे. रामदासपेठ येथील ६० वर्षीय मंगेश मोपकर यांनी बँक ऑफ इंडियातून ऐच्छिक सेवानिवृत्ती घेतली. ३० पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे त्यांनी संचालन केले. मंगेश हे गुरुवारी टोकियोकडे उड्डाण भरणार आहे मंगळवारी मंगेश मोपकर यांचा महापौर दयाशंकर तिवारी यांनी सन्मान करीत शुभेच्छा दिल्या. यावेळी मनपाचे क्रीडा समितीचे प्रमुख प्रमोद तभाने, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, खेळ अधिकारी पीयूष अंबुलकर व राजेश मोपकर उपस्थित होते.

- आंतरराष्ट्रीय प्रवास

मंगेश मोपकर यांनी १९९६ मध्ये इंग्लंडमध्ये पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय टुर्नामेंट दरम्यान रेफरीची परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांना इंदोरमध्ये ब्ल्यू बॅच अम्पायरचा सन्मान प्राप्त झाला. त्यांनी चीन, हाँगकाँग, इंग्लंड, कोरिया, तायवान, जपान आदी देशात झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे यशस्वी संचालन केले.

टेबल टेनिससाठी समर्पिंत परिवार

मोपकर परिवाराचा टेबल टेनिसशी जवळचा संबंध आहे. वडील अविनाश मोपकरसह भाऊ राजेश यांनी या खेळात तांत्रिक अधिकारी व कोच म्हणून बरेच काळ सेवा केली आहे.

Web Title: Table tennis referee Mopkar to leave for Japan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.