नागपुरात बर्थ डे पार्टीत छेडछाड आणि हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 02:05 PM2017-11-18T14:05:06+5:302017-11-18T14:09:35+5:30
हॉटेलमध्ये सुरू असलेली बर्थ डे पार्टी रंगात आली. मद्याचे पेग चढल्यानंतर एकाने संधी साधून एका तरु णीसोबत लज्जास्पद वर्तन केले आणि पार्टीचा नूरच बदलला. जबरदस्त हाणामारी, शिवीगाळ, गोंधळ वाढला अखेर या बर्थ डे पार्टीचा समारोप सोनेगाव पोलीस ठाण्यात झाला.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : हॉटेलमध्ये सुरू असलेली बर्थ डे पार्टी रंगात आली. मद्याचे पेग चढल्यानंतर हॉटेलमधील मंद प्रकाशात तरु णी-महिलांसोबत तरु णही थिरकू लागले. एकाने संधी साधून एका तरु णीसोबत लज्जास्पद वर्तन केले आणि पार्टीचा नूरच बदलला. जबरदस्त हाणामारी, शिवीगाळ, गोंधळ वाढला अखेर या बर्थ डे पार्टीचा समारोप सोनेगाव पोलीस ठाण्यात झाला.
सर्वत्र चर्चेचा विषय ठरलेली ही घटना शुक्र वारी रात्री ११.३० वाजता वर्धा मार्गावरील हॉटेल झारमध्ये घडली.
एका तरु णाच्या वाढदिवसानिमित्त झारमध्ये शुक्र वारी रात्री एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. पार्टीत काही बिल्डर, प्रॉपर्टी डिलर, व्यापारी आणि काही गुन्हेगारही सहभागी झाले होते. रात्री ११ नंतर पार्टी रंगात आली. पेग वर पेग चढले आणि संगीताच्या तालावर पार्टीत सहभागी झालेल्या तरु णी, महिलांसोबत पुरूषही थिरकू लागले. मंद प्रकाशात नृत्य सुरू असताना आरोपी शकिल गफ्फार खान (वय ३०, गोवा कॉलनी, सदर) याने एका मुलीसोबत लज्जास्पद वर्तन केले. ते पाहून इक्राम ईकबाल शेख (वय ३३, रा. मानकापूर) यांनी आरोपी शकिलला हटकले. त्यामुळे त्यावरून वाद वाढला. शिवीगाळीनंतर दोघांनीच नव्हे तर त्यांच्या मित्रांनीही एकमेकांना ठोसे लगावणे सुरू केले. त्यामुळे पार्टीचा नूरच बदलला. डान्स फ्लोअरवर नृत्याऐवजी जोरदार हाणामारी, फेकाफेक सुरू झाल्याने पार्टीत आरडाओरड, गोंधळ वाढला. अनेकांनी स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद न घेताच हॉटेलमधून काढता पाय घेतला. शेवटी हे प्रकरण सोनेगाव पोलीस ठाण्यात पोहचले. इक्राम यांनी शकील तसेच त्याच्या दोन साथीदारांविरु द्ध मारहाण करून ३ लाख रु पयांची सोनसाखळी हिसकावून घेतल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी उपरोक्त आरोपींविरु द्ध गुन्हा दाखल केला. शनिवारी दुपारपर्यंत कोणत्याही आरोपीला अटक झालेली नव्हती.
मूळ मुद्दयाला बगल
विशेष म्हणजे, ज्या मुद्यावरून बर्थ डे पार्टीत हाणामारी झाली. त्याला संबंधितांनी पद्धतशीर बगल दिली. ज्या मुलीची छेड काढण्यात आली होती, त्या मुलीने तक्रार करण्याचे टाळले. तर, आयोजक आणि बिल्डर असलेल्या ईक्र ाम यांनी देखिल तिला तक्रार देण्यास बाध्य करण्याचे टाळले. त्यामुळे भर पार्टीत मुलीसोबत लज्जास्पद वर्तन करणारा आरोपी शकिल याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला नाही.