तडफडणाºया तुंबडे काकू अन् संवेदनाहीन समाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2017 01:41 AM2017-11-09T01:41:17+5:302017-11-09T01:41:29+5:30

स्मिता जयंत तुंबडे. मॉर्निंग वॉक ही त्यांची नित्याची सवय. पती मॉर्निंग वॉकवरून परतले की त्या घराबाहेर पडायच्या. बुधवारी प्रतापनगर भागातील मुख्य रस्त्यावर मॉर्निंग वॉक सुरू असताना अचानक कुठुन तरी एक भरधाव वाहन आले....

Tadfadana Tumbade Kaku or Senseless Society | तडफडणाºया तुंबडे काकू अन् संवेदनाहीन समाज

तडफडणाºया तुंबडे काकू अन् संवेदनाहीन समाज

googlenewsNext
ठळक मुद्देमॉर्निंग वॉक करताना अपघात : गर्दीतील कुणीही नेले नाही इस्पितळात

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्मिता जयंत तुंबडे. मॉर्निंग वॉक ही त्यांची नित्याची सवय. पती मॉर्निंग वॉकवरून परतले की त्या घराबाहेर पडायच्या. बुधवारी प्रतापनगर भागातील मुख्य रस्त्यावर मॉर्निंग वॉक सुरू असताना अचानक कुठुन तरी एक भरधाव वाहन आले आणि काही कळायच्या आतच थेट त्यांच्यावर धडकले. प्राणांतिक वेदनेने तडफडत त्या रस्त्यावर कोसळल्या. लोक जमले, गर्दी वाढत गेली. पण, या गर्दीतल्या एकानेही हाकेच्या अंतरावरील रुग्णालयात त्यांना हलवले नाही. सगळेच्या सगळे मन दगडाचे करून पोलिसांची वाट पाहत बसले
अन् पांढरपेशा समाजाची हीच संवेदनहिनता स्मिता तुंबडे यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरली.
नागपूर शहर मेट्रो म्हणून विकसित होत असताना नागरिकांच्या संवेदना मात्र अशा हरवत चालल्या आहेत. तुंबडेकाकूंच्या दुर्र्दैवी निधनाने हीच हळहळ व्यक्त केली जात आहे. स्मिता तुंबडे (५७) या प्रतापनगर चौकातील सप्तक अपार्टमेंटमध्ये राहणाºया गृहिणी. या फ्लॅटमध्ये पती-पत्नी दोघेच राहतात. मुलगा अनिकेत बंगळुरूत सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे व मुलगी मुंबईला राहते. सकाळी फिरायला जाणे हा त्यांचा नित्यक्रम. पती जयंत तुंबडे फिरून आल्यानंतर त्या घराबाहेर पडायच्या. सकाळी ५.४५ च्या दरम्यान त्या फिरायला निघाल्या. प्रतापनगर रोडवरील बडजाते हॉस्पिटलजवळ त्यांना अज्ञात वाहनचालकाने धडक दिल्याने त्या रस्त्यावर पडल्या. वाहन चालक पळून गेला. दरम्यान या रोडवर नियमित मॉर्निंग वॉक करणाºयांनी त्यांना पाहिले. यातील कुणीतरी पोलिसांना व १०८ क्रमांकावर फोन केला. त्यांना पाहणाºयांची गर्दी होती. मात्र या गर्दीमध्ये त्यांना त्वरित रुग्णालयात नेण्यासाठी कुणीही समोर आले नाही. ‘त्या कुठल्या आहेत, आपल्या ओळखीच्या आहेत का, पोलिसांना येऊ द्या’ अशा चर्चा केवळ सुरू होत्या. यादरम्यान ओसीडब्ल्यूचे पीआरओ सचिन द्रवेकर गर्दी पाहून तेथे पोहचले. त्यांना त्वरित रुग्णालयात नेण्यासाठी त्यांनी हालचाली सुरू केल्या. तेवढ्यात पोलिसांची गाडी आली आणि त्यांना जवळच्या डॉ. पाटील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
पत्रकाराने दाखविली संवेदना
रस्त्यावर पडून असलेल्या स्मिता तुंबडे यांना पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी झाली होती. साधारणत: १५ मिनिटानंतर या मार्गाने जात असलेले सचिन द्रवेकरही गर्दी पाहून तेथे पोहचले. त्यातील कुणीतरी पोलिसांना फोन केल्याचे सांगत होते. मात्र द्रवेकर यांनी आधी त्यांना रुग्णालयात पोहचविण्याची विनंती केली. आॅटोही थांबविण्याचे प्रयत्न केले. जवळ राहणाºयांना गाडी आणण्याचे आवाहन केले. याच भागात राहणारे ज्येष्ठ पत्रकार महेश उपदेव गर्दी पाहून तेथे पोहचले. यादरम्यान पोलिसांची गाडी तेथे दाखल झाली. द्रवेकर आणि उपदेव यांनी तुंबडे यांना पोलिसांच्या मदतीने रुग्णालयात नेले. मात्र आधीच उशीर झाल्याने त्यांचेही प्रयत्न निष्फळ ठरले.

Web Title: Tadfadana Tumbade Kaku or Senseless Society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.