Nagpur Monsoon Session 2018 : तहसीलदार द्या, तहसीलदार; महिला आमदारांनी केले आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2018 11:47 AM2018-07-13T11:47:44+5:302018-07-13T11:48:18+5:30

विधानभवनाच्या पाय-यांवर शुक्रवारी सकाळी घोषणाबाजी करीत आंदोलन केले. 

Tahsildar, tahsildar; Movement by women legislators | Nagpur Monsoon Session 2018 : तहसीलदार द्या, तहसीलदार; महिला आमदारांनी केले आंदोलन

Nagpur Monsoon Session 2018 : तहसीलदार द्या, तहसीलदार; महिला आमदारांनी केले आंदोलन

googlenewsNext

नागपूर: नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्याला कायमस्वरुपी तहसीलदार द्यावा या मागणीसाठी काँग्रेसच्या महिला आमदार दिपिका चव्हाण, अनिता चव्हाण, संध्याताई तुपेकर, ज्योती कलानी यांनी विधानभवनाच्या पाय-यांवर शुक्रवारी सकाळी घोषणाबाजी करीत आंदोलन केले. 

आठ दिवसांत तहसीलदार दिला नाहीतर गावकºयांसह आंदोलन केले जाईल असा इशारा दिपिका चव्हाण यांनी दिला. गेल्या दीड वर्षापासून बागलाण विधानसभा मतदारसंघाला कायमस्वरुपी तहसीलदार नसल्यामुळे ग्रामीण जनतेला अडचणींचा सामना करावा लागत आहे. हा आदिवासी बहुल तालुका असल्यामुळे १७१ ग्रामपंचायतींचा कारभार या तालुक्याच्या माध्यमातून चालतो. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री गिरीश महाजन यांना निवेदन दिले आहे. परंतु अद्यापही कोणती कारवाई करण्यात आली नसल्याची माहिती आमदारांनी यावेळी दिली.

Web Title: Tahsildar, tahsildar; Movement by women legislators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.