रस्त्याच्या दुतर्फा होणाऱ्या वाहतूक कोंडीविरोधात कारवाई करा : मनसेची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:10 AM2020-12-30T04:10:35+5:302020-12-30T04:10:35+5:30
नागपूर : रस्त्याच्या दुतर्फा होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना बराच त्रास सहन करावा लागतो. लहान-मोठे अपघातही घडतात. यामुळे या ...
नागपूर : रस्त्याच्या दुतर्फा होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना बराच त्रास सहन करावा लागतो. लहान-मोठे अपघातही घडतात. यामुळे या विरोधात कारवाई करा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रणित जनहित कक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांकडे निवेदनातून केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रणित जनहित कक्षाचे उपशहर अध्यक्ष कुशल मोंदेकर यांच्या नेतृत्वात नागपूर वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जाधव यांना निवेदन देऊन गोळीबार चौक ते चिटणीस पार्क चौक व चिटणीस पार्क ते अग्रसेन चौकापर्यंत आणि आजूबाजूच्या अन्य मार्गावरील वाहतूक समस्येवर तोडगा काढण्याची मागणी करण्यात आली.
रस्त्याच्या दुतर्फा बेशिस्त पार्किंगमुळे वाहतूक कोंडी होते. रुग्णवाहिकांनाही मार्ग मिळत नाही. पाचपावली पुलावर आणि गांजाखेत चौकासमोर कोंडीमुळे वाहनांच्या रांगा लागतात. वायू व ध्वनी प्रदूषणाचा त्रास व्यापाऱ्यांना सहन करावा लागतो आदी समस्या निदर्शनास आणून देण्यात आल्या. चर्चेनंतर संयुक्त जनजागृती मोहीम राबविण्याचे ठरले. यावेळी जनहित कक्षाचे विभाग अध्यक्ष कुशल मोंदेकर, प्रदेश सरचिटणीस महेश जोशी, जिल्हाध्यक्ष इकबाल रिझवी, शहर अध्यक्ष अरुण तिवारी, गणेश मुदलियार, कल्पना चव्हाण, पराग सावजी, नितीन खानोरकर, रोहन रायपुरे, मनीषा पऱ्हाड, सुनीता बोडखे, पल्लवी नगरारे, प्रिया वानखेडे आदी उपस्थित होते.