शुभेच्छुकांवर कारवाई करा
By admin | Published: December 11, 2015 03:30 AM2015-12-11T03:30:04+5:302015-12-11T03:30:04+5:30
अवैध होर्डिंग्जवरील शुभेच्छुकांवर कारवाई करण्याचे मौखिक निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी महानगरपालिकेला ....
नागपूर : अवैध होर्डिंग्जवरील शुभेच्छुकांवर कारवाई करण्याचे मौखिक निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी महानगरपालिकेला दिलेत.याप्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व प्रदीप देशमुख यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, मनपातर्फे बाजू मांडताना अॅड. सुधीर पुराणिक यांनी अधिकाऱ्यांची अडचण सांगितली.
अधिकारी अवैध होर्डिंग्ज काढतात पण, रात्री पुन्हा होर्डिंग्ज लावले जातात याकडे लक्ष वेधून त्यांनी गेल्या काही महिन्यांतील कारवाईची आकडेवारी सादर केली. ही बाब लक्षात घेता न्यायालयाने वरीलप्रमाणे निर्देश देऊन पुढील सुनावणी १७ डिसेंबर रोजी निश्चित केली.
तसेच, किती शुभेच्छुकांवर कारवाई केली याची माहिती पुढील तारखेस देण्यास सांगितले. याविषयी परिवर्तन समूहाचे सचिव दिनेश नायडू व अॅड. रसपालसिंग रेणू यांनी दोन वेगवेगळ्या अवमानना याचिका दाखल केल्या आहेत. याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. तुषार मंडलेकर यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)