संधीचे साेने करा, उद्याेगतेची कास धरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:10 AM2021-02-11T04:10:15+5:302021-02-11T04:10:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क उमरेड : ग्रामीण भागात असल्याची मरगळ झटकून टाका. ग्रामीण भागात राहून काही तरी हटके करण्याच्या असंख्य ...
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : ग्रामीण भागात असल्याची मरगळ झटकून टाका. ग्रामीण भागात राहून काही तरी हटके करण्याच्या असंख्य संधी उपलब्ध आहेत. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्या. मिळालेल्या संधीचे सोने करा, उद्योजकतेची कास धरा, असे आवाहन उमरेड तालुक्यातील बारव्हा येथे पार पडलेल्या ग्रामीण युवक उद्योजकता विकास प्रशिक्षणात कृषी अधिकाऱ्यांनी केले.
कृषी महाविद्यालय नागपूरच्या वतीने अनुसूचित जाती उपयोजनाअंतर्गत या प्रशिक्षणाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. यावेळी कृषी महाविद्यालयाचे डॉ. एम. के. राठोड, कविता डंभारे, डॉ. रमाकांत गजभिये, डॉ. एस. एम. नवलाखे, डॉ. हरीश सवाई, तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे, मंडळ कृषी अधिकारी सी. एस. कोल्हे, एस. यू. मेश्राम, कृषी सहायक अनिल डफरे, अजय वऱ्हाडे, गजानन मुंगले, राहुल तागडे, संजय रामटेके, रामदास बोरकर, दादाराव मुटकुरे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विलास तेलगोटे यांनी केले. संचालन एस. एन. सुके यांनी केले. आभार राहुल तागडे यांनी मानले. या प्रशिक्षणात ५० तरुण-तरुणींनी सहभाग घेतला.