अर्जुन परतला जगण्याची शिदोरी घेऊन

By admin | Published: April 10, 2016 03:17 AM2016-04-10T03:17:03+5:302016-04-10T03:17:03+5:30

सहा वर्षापूर्वी ११ वर्षाचा एक मुलगा, मुंबईच्या रेल्वेस्थानकावर समतोल फाऊंडेशनच्या सदस्यांना सापडला.

Take Arjun back to life | अर्जुन परतला जगण्याची शिदोरी घेऊन

अर्जुन परतला जगण्याची शिदोरी घेऊन

Next

मंगेश व्यवहारे नागपूर
सहा वर्षापूर्वी ११ वर्षाचा एक मुलगा, मुंबईच्या रेल्वेस्थानकावर समतोल फाऊंडेशनच्या सदस्यांना सापडला. घरातून पळून तो मुंबईत आला होता. रेल्वेस्थानकावरील मुलांसोबत राहून व्यसनांच्या आहारी गेला होता. या मुलाला नागपुरातील प्लॅटफॉर्म ज्ञानमंदिरात आणण्यात आले. अंगावर मळकट फाटके कपडे, केस विसकटलेले, बालपणीच आयुष्य हरविल्यागत तो होता. प्लॅटफॉर्म ज्ञानमंदिरमध्ये त्याच्यावर अध्ययनाबरोबर आचार-विचारांचे संस्कार झाले. आपल्या आयुष्याची सहा वर्ष त्याने येथे घालविली. येथे तो स्वत:च्या आयुष्याबद्दल जबाबदार झाला. शिक्षण घेऊन सुसंस्कृत झाला. एक जबाबदार, संवेदनशील नागरिक म्हणून तो आज आपल्या घराकडे परतला आहे. जे संस्कार आई-वडिलांनी त्याच्यावर करायचे होते, ते प्लॅटफॉर्म ज्ञानमंदिरातून त्याच्यावर झाले आणि त्याचे आयुष्य पुन्हा रुळावर आले.

झारखंड येथील रहिवासी अर्जुन चौधरी असे त्याचे नाव. ११ वर्षाचा असताना अर्जुनने घरातून १०० रुपये घेऊन पळ काढला होता. मुंबईच्या प्लॅटफॉर्मवर मुलांसोबत भटकत असताना तो समतोल फाऊंडेशनला सापडला. फाऊंडेशनने त्याला लोहमार्ग पोलिसांच्या मदतीने नागपुरातील प्लॅटफॉर्म ज्ञानमंदिरात आणले. अतिशय जिद्दी आणि चिडखोर स्वभावाच्या अर्जुनला कशाचीही भ्रांत नव्हती.
शिक्षणात तर त्याचे मनच रमत नव्हते. व्यसनांच्या आहारी गेल्याने त्याची मानसिकता ढासळलेली होती. आई-वडिलांबद्दल त्याची तसूभरही आस्था नव्हती. अशा अवस्थेत प्लॅटफॉर्म शाळेने त्याला सांभाळले. त्याची मानसिकता बदलविण्यासाठी समुपदेशन केले. त्याच्यावर आचार-विचारांचे संस्कार केले. त्याचे लक्ष विचलित करण्यासाठी त्याला खेळाकडे प्रवृत्त केले. हळूहळू तो इतर मुलांमध्ये रमला. त्याचे बोलणे, राहणे, वागणे यावर लक्ष केंद्रित केले. त्याच्यातील होत असलेले बदल लक्षात घेऊन, त्याला भविष्याची समज दिली. अध्ययनाकडे त्याच्यात आवड निर्माण केली. त्याला शाळेत दाखला मिळवून दिला. हळूहळू त्याच्या स्वभावात परिवर्तन झाले. तो नियमित शाळेत जायला लागला, अभ्यास करायला लागला. दहावीत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला. अर्जुन आज अकरावीत शिकतो आहे. आज तो जबाबदार, संस्कारीत झाला आहे.
सहा वर्षे तो शाळेत शिकत असताना ज्ञानमंदिराच्या प्रकल्प प्रमुखांनी त्याच्या आई-वडिलांशी त्याची भेट करून दिली. अर्जुन लहानपणापासून त्याच्या मोठ्या वडिलांकडे राहत होता.
त्यांचा थकता काळ असल्याने, अर्जुनला त्यांनी परत गावी बोलाविले आहे.
अर्जुनलाही आपल्या कृत्याचा पश्चाताप झाला आहे. यापुढे आईवडिलांचा भविष्याचा आधार बनण्याचा संकल्प करून तो शनिवारी

Web Title: Take Arjun back to life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.