पाेत सांभाळण्यासाठी जमिनीची काळजी घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:08 AM2020-12-06T04:08:58+5:302020-12-06T04:08:58+5:30
रामटेक/ जलालखेडा/ बाजारगाव : रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचा पाेत खालावत चालला असून, पिकांची उत्पादकताही घटत चालली आहे. जमिनीचा पाेत ...
रामटेक/ जलालखेडा/ बाजारगाव : रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचा पाेत खालावत चालला असून, पिकांची उत्पादकताही घटत चालली आहे. जमिनीचा पाेत कसा सांभाळायचा, ताे सांभाळताना नेमकी काेणती काळजी घ्यायची यासह अन्य महत्त्वाच्या बाबींवर कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना जागतिक मृदा दिनानिमित्त आयाेजित कार्यक्रमांमध्ये मार्गदर्शन केले. शिवाय, जमिनीचा पाेत सांभाळण्याचे आवाहनही केले.
रामटेक तालुक्यातील काचूरवाही येथील बाजार चाैकात आयाेजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला नारायण ताेडमल, देवेंद्र गाेल्हर, रमेश नाटकर, गजानन भलमे, रवींद्र माेहनकर, सुदाम धुर्वे, गाैतम चरडे, खेमराज बावनकुळे, लहू बावनकुळे, शुभम कांबळे, प्रशांत आबागडे, प्रणित बावनकुळे, मधुकर माेहनकर यांच्यासह शेतकरी उपस्थित हाेते. रामटेक तालुका कृषी अधिकारी कार्यलयाच्यावतीने किरणापूर, चाेखाळासह अन्य गावांमध्यही कार्यक्रम घेण्यात आले.
नरखेड पंचायत समितीच्या कृषी विभागाच्यावतीने तालुक्यातील वडेगाव (उमरी) व नायगाव येथे कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. या कार्यक्रमांना जिल्हा परिषद सदस्य प्रीतम कवरे, पंचायत समिती सभापती नीलिमा रेवतकर, उपसभापती वैभव दळवी,तालुका कृषी अधिकारी डाॅ. याेगीराज जुमडे, दिलीप हिवरकर, वडेगावचे सरपंच रुपेश मुंदाफळे, नायगावचे किसना उईके, गणेश नाकाडे,घनश्याम ठाकरे, नत्थू ढाेपरे, प्रवीण बेलखडे, कृषी सहायक अमित वानखेडे, लांडे, खडतकर, शगहूकर, खसारे, निमजे यांच्यासह शेतकरी उपस्थित हाेते.
बाजारगाव येथील गाेपाळपुरी येथेही कार्यक्रम आयाेजित करण्यात आला हाेता. याप्रसंगी पंचायत समिती सदस्य अविनाश पारधी, सरपंच तुषार चाैधरी, रेखा गावंडे, रिता तिवारी, मंडळ कृषी अधिकारी बी. आर. गाैरखेडे, ज्याेती बाेडखे, कविता मुरकुटे, आशिष भगत यांच्यासह बाजारगाव, शिवा, पांजरा, सावंगा येथील शेतकरी व कृषी विभागाचे कर्मचारी उपस्थित हाेते. संचालन ए. एन.रंधे यांनी केले तर पी. जी. राठाेड यांची आभार मानले.
---
माती परीक्षण महत्त्वाचे
काेणतेही पीक घेताना आधी माती व पाणी परीक्षण करणे आवश्यक आहे. त्यामुळे मातीत काेणते घटक कमी व काेणते अधिक आहे, याची माहिती मिळते. शिवाय, काेणत्या पिकाला काेणत्या घटकाची आवश्यकता आहे, याची माहिती हाेत असल्याने ते घटक पिकांना देणे सहज शक्य हाेते. त्यातून उत्पादकता वाढण्यास मदत हाेते. परीक्षणामुळे माती व पाण्याची ‘पीएच व्हॅल्यू’ कळते. शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रीय खतांवर भर देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.