विधिसंघर्षग्रस्त बालकांना हाताळताना घ्या दक्षता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:08 AM2021-01-25T04:08:46+5:302021-01-25T04:08:46+5:30
नागपूर : विधिसंघर्षग्रस्त बालकांना गुन्हेगारी वातावरण व गुन्हेगारी कृत्यापासून परावृत्त करण्यासाठी तसेच त्यांच्या चौकशीदरम्यान हाताळताना घ्यावयाची दक्षता यासंबंधाने पोलिसांना ...
नागपूर : विधिसंघर्षग्रस्त बालकांना गुन्हेगारी वातावरण व गुन्हेगारी कृत्यापासून परावृत्त करण्यासाठी तसेच त्यांच्या चौकशीदरम्यान हाताळताना घ्यावयाची दक्षता यासंबंधाने पोलिसांना टिप्स देण्यात आल्या. नागपूर पोलीस आयुक्तालय व जिल्हा महिला व बालविकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने बाल पोलीस अधिकारी यांच्याकरिता बाल न्याय अधिनियम कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव अभिजित देशमुख, पोलीस उपायुक्त गजानन राजमाने, बालकल्याण समितीच्या सदस्य सुरेखा बोरकुटे, जि.म. व बाल विकास अधिकारी अपर्णा कोल्हे आदी उपस्थित होते. डॉ. आशिष कुथे व अनघा राजे यांनी मार्गदर्शन केले. जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण, बालकल्याण समिती सदस्य अंजली साळवे विटनकर यांनी लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण यावर व्याख्यान दिले. संचालन कैलास मगर यांनी केले. प्रास्ताविक ज्योती वानखेडे व आभार उज्ज्वला मडावी यांनी मानले.