‘एटीकेटी’ व बहि:शाल विद्यार्थ्यांची २० जानेवारी अगोदर परीक्षा घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 10:29 AM2020-12-23T10:29:43+5:302020-12-23T10:30:54+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ‘एटीकेटी’च्या तसेच बहि:शाल विद्यार्थ्यांच्या परीक्षा महाविद्यालयीन पातळीवर घेण्यात येणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ‘एटीकेटी’च्या तसेच बहि:शाल विद्यार्थ्यांच्या परीक्षा महाविद्यालयीन पातळीवर घेण्यात येणार आहेत. या परीक्षा २० जानेवारी अगोदर घ्यायच्या असून परीक्षा झाल्यावर दोन दिवसांच्या आत विद्यापीठाला गुण पाठवायचे आहेत. ‘ऑफलाईन’, ‘ऑनलाईन’ किंवा दोन्ही पर्याय एकत्र वापरून ही परीक्षा घेता येणार आहे.
‘कोरोना’मुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षा लांबल्या. अंतिम वर्षाच्या ‘ऑनलाईन’ परीक्षा तर आटोपल्या, मात्र ‘एटीकेटी’ तसेच बहि:शाल विद्यार्थ्यांच्या परीक्षांवरुन प्रश्न उपस्थित होत होते. अखेर विद्यापीठाने परिपत्रक जारी केले आहे. २८ डिसेंबर २०२० ते २ जानेवारी २०२१ या कालावधीत महाविद्यालयांना प्रात्यक्षिक परीक्षा घ्यायच्या आहेत. तर त्यानंतर लेखी परीक्षेचे आयोजन करायचे आहे. बहुपर्यायी प्रश्न विचारण्याचीदेखील मुभा देण्यात आली आहे.