नागपुरातील पाणी समस्यांवर तात्काळ तोडगा काढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 10:29 PM2018-05-16T22:29:19+5:302018-05-16T22:29:49+5:30

प्रभाग क्रमांक २७ मधील सुदामपुरी, भांडेप्लॉट परिसरातील ज्या वस्त्यात पाण्याला दाब नाही तेथे पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करण्यासाठी तात्काळ उपायोजना करून नागरिकांना नियमित पाणी देण्याचे निर्देश महापौर नंदा जिचकार आणि आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी बुधवारी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

Take an immediate settlement on water issues in Nagpur | नागपुरातील पाणी समस्यांवर तात्काळ तोडगा काढा

नागपुरातील पाणी समस्यांवर तात्काळ तोडगा काढा

googlenewsNext
ठळक मुद्देमहापौर, आयुक्तांचे निर्देश : विरोधी पक्षनेत्यांसह सुदामपुरी, भांडेप्लॉटचा पाहणी दौरा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रभाग क्रमांक २७ मधील सुदामपुरी, भांडेप्लॉट परिसरातील ज्या वस्त्यात पाण्याला दाब नाही तेथे पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करण्यासाठी तात्काळ उपायोजना करून नागरिकांना नियमित पाणी देण्याचे निर्देश महापौर नंदा जिचकार आणि आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी बुधवारी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
सुदामपुरी परिसरातील काही भागात अनेक दिवसांपासून नियमित पाणी मिळत नाही. पाणी आले तर दाब नसतो. कमी वेळ पाणी पुरवठा असतो, टँकर नियमित येत नाही, अशा नागरिकांच्या तक्रारी होत्या. त्यामुळे परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे आणि नगरसेविका दिव्या धुरडे यांच्या विनंतीवरून महापौर आणि आयुक्तांनी या परिसराचा दौरा केला.
यावेळी जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके, झोन सभापती रिता मुळे, सतरंजीपुरा झोन सभापती यशश्री नंदनवार, अपर आयुक्त रवींद्र कुंभारे, कार्यकारी अभियंता (जलप्रदाय) संजय गायकवाड, नेहरूनगर झोनचे सहायक आयुक्त राजेश कराडे यांच्यासह ओसीडब्ल्यूचे राजेश कालरा आदी उपस्थित होते.
नागरिकांनी महापौर व आयुक्तांसमोर पाण्याच्या समस्या मांडल्या.परिसरात पाण्याचा नियमित पुरवठा करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश महापौरांनी दिले. तानाजी वनवे यांनी एनआयटी कॉम्प्लेक्स, आयुर्वेदिक कॉलनी, भांडेप्लॉट आदी परिसरातही पाणी समस्या असल्याचे निदर्शनास आणले. यावेळी एनआयटी कॉम्प्लेक्सच्या रहिवाशांनी महापौर व आयुक्तांना निवेदनही सादर केले.

Web Title: Take an immediate settlement on water issues in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.