जमीन बळकावण्याचा खटला जलदगती न्यायालयात चालवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:08 AM2021-03-08T04:08:51+5:302021-03-08T04:08:51+5:30
नागपूर : सोनेगाव येथील कोका कोला कंपनीपुढील कोट्यवधी रुपये किमतीची जमीन बनावट दस्तावेजांच्या आधारे बळकावण्याच्या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात ...
नागपूर : सोनेगाव येथील कोका कोला कंपनीपुढील कोट्यवधी रुपये किमतीची जमीन बनावट दस्तावेजांच्या आधारे बळकावण्याच्या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा अशी मागणी ॲड. सतीश उके यांनी राज्य सरकारला केली आहे. उके यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
संबंधित जमीन गोवा येथील प्रा. सविता तनेजा यांची आहे. २००३ मध्ये माजी नगरसेवक मुन्ना यादव यांचे मित्र धरमदास रमानी यांनी ही जमीन बळकावण्याचा कट रचला व तनेजा यांचा मृत्यू झाल्याचे दाखवले. त्याकरिता यादव यांनी २० ऑक्टोबर २००३ रोजी स्वत:च्या लेटरपॅडवर तनेजा यांचा १९ डिसेंबर १९९९ रोजी मृत्यू झाल्याचे प्रमाणपत्र दिले. त्यानंतर तनेजा यांचे बनावट नातेवाईक चेतन तनेजा यांना समोर करण्यात आले. रमानी यांनी चेतन तनेजाकडून दिनेशच्या नावावर पॉवर ऑफ ॲटर्नी करून ती जमीन बिल्डरला विकली. दिनेश रमानी यांचा कर्मचारी होता. दरम्यान, उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे पोलिसांनी सविता तनेजा यांच्या तक्रारीवरून २००४ मध्ये आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. परंतु, आरोपींना वाचवण्यासाठी सदोष आरोपपत्र तयार करण्यात आले असा आरोप उके यांनी केला. तसेच, या प्रकरणात यादव यांना आरोपी करण्याची व सर्व आरोपींविरुद्ध सुधारित आरोपपत्र तयार करण्याची मागणी केली.