निरोप घेतो आता :

By admin | Published: September 28, 2015 03:03 AM2015-09-28T03:03:34+5:302015-09-28T03:03:34+5:30

‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने दुमदुमलेला आसमंत, ढोल-ताशांचा निनाद अशा भक्तीपूर्ण वातावरणात रविवारी उपराजधानीत लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला.

Take the message now: | निरोप घेतो आता :

निरोप घेतो आता :

Next


‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने दुमदुमलेला आसमंत, ढोल-ताशांचा निनाद अशा भक्तीपूर्ण वातावरणात रविवारी उपराजधानीत लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला. शहरातील विविध तलावांसह गांधीसागर तलावातही विविध मंडळांच्या गणरायाचे विसर्जन करण्यात आले. यावेळी जगदीश खरे यांनी गणरायाला डोक्यावर घेऊन उडी घेत गणरायाला निरोप दिला.
दोन लाखांहून अधिक मूर्तींचे विसर्जन
३५० टन निर्माल्य गोळा
नागपूर : दहा दिवस मनोभावे पूजाअर्चा केल्यानंतर रविवारी अनंत चर्तुदशीला बाप्पाला भक्तीभावाने निरोप देण्यात आला. शहरात सर्वत्र ढोल-ताशांच्या गजरात गुलालाची उधळण करीत मिरवणुका काढण्यात आल्या. काही मोठ्या मंडळाचे गणपती सकाळीच मंडपातून बाहेर पडले. तसेच घरगुती गणपतीच्या विसर्जनासाठी कृत्रिम टँक व तलावावर भाविकांनी सकाळपासून गर्दी केली होती. महापालिकेतर्फे शहरातील सर्व भागात तसेच तलावाच्या काठावर उभारण्यात आलेल्या कृत्रिम टँकमध्ये विसर्जन करण्याला भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
कृ त्रिम टँकमध्ये विसर्जनाला प्रतिसाद
विसर्जनासोबतच निर्माल्य गोळा करण्याची व्यवस्था करण्यात आली होती. शहरातील तलाव तसेच मनपा प्रशासनाने शहरात ११८ ठिकाणी तयार केलेले फायबर टँक व १५ ठिकाणी खड्डे खोदून विसर्जनाची व्यवस्था केली होती. दोन लाखांहून अधिक घरगुती तर सार्वजनिक मंडळाच्या ४१३ मोठ्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. विसर्जनाच्या ठिकाणी ३५० टन निर्माल्य गोळा करण्यात आले.

Web Title: Take the message now:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.