प्रकल्पग्रस्तांना १५ डिसेंबरपर्यंत सेवेत घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 12:55 AM2017-11-12T00:55:06+5:302017-11-12T00:55:17+5:30
मौदा येथील नॅशनल थर्मल पॉवर कॉपोर्रेशन (एनटीपीसी) प्रकल्पात ज्यांच्या जमिनी व घरे गेली आहेत व ज्यांना जिल्हाधिकाºयांकडून प्रकल्पग्रस्ताचे प्रमाणपत्र मिळाले आहे,...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मौदा येथील नॅशनल थर्मल पॉवर कॉपोर्रेशन (एनटीपीसी) प्रकल्पात ज्यांच्या जमिनी व घरे गेली आहेत व ज्यांना जिल्हाधिकाºयांकडून प्रकल्पग्रस्ताचे प्रमाणपत्र मिळाले आहे, अशांना येत्या १५ डिसेंबरपर्यत एनटीपीसीने सेवेत सामावून घ्यावे, असे निर्देश ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एनटीपीसीला दिले.
मौदा येथे शनिवारी ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी एनटीपीसीच्या अधिकाºयांची बैठक घेतली. तीत एनटीपीसीचे महाव्यवस्थापक नंदा, राजकुमार, अन्य वरिष्ठ अधिकारी व प्रकल्पग्रस्त कुटुंबांचे प्रतिनिधी उपस्थित होते. प्रकल्पग्रस्तांपैकी ६० ते ७० जणांना अजूनही नोकरी मिळालेली नाही. प्रकल्पग्रस्तांना डावलून बाहेरच्या लोकांना नोकरी दिली जात आहे, अशा तक्रारी प्रकल्पग्रस्तांच्या प्रतिनिधींनी केल्या. यावर जिल्हाधिकाºयांचे प्रकल्पग्रस्त म्हणून प्रमाणपत्र असलेल्यांनी तहसिलदार आणि खंडविकास अधिकारी यांच्याकडे जाऊन नोंदणी करावी व या दोन्ही अधिकाºयांनी प्रकल्पग्रस्तांना आधी नोकरी मिळावी याची जबाबदारी पार पाडावी, अशा सूचनाही बावनकुळे यांनी दिल्या.
मध्यंतरीच्या काळात एनटीपीसीने १०२ जागा काढल्या होत्या. पण नियुक्त्या होत असतानाच कुणीतरी न्यायालयात गेले व स्थगिती आली. यात काही प्रकल्पग्रस्तांचाही समावेश आहे. स्थानिकांपैकी १३२२ जणांना विविध प्रकारच्या कामावर घेण्यात आल्याची माहिती एनटीपीसीच्या अधिकाºयांनी दिली. या प्रकल्पात बेरोजगारांच्या सात सहकारी सोसायटी नोंदणीकृत आहेत. पण त्यांना काम दिले जात नसल्याच्या तक्रारीवर ऊर्जामंत्र्यांनी या सर्व सोसायट्यांची बैठक घेऊन प्रश्न निकाली काढण्याचे निर्देश दिले. प्रकल्पग्रस्त आणि प्रदूषणाच्या सीमेत असलेल्या गावातील विद्यार्थ्यांना सीबीएसईच्या शाळांमध्ये प्रवेशासाठी आरक्षण मिळावे यासाठी एनटीपीसीने कारवाई करावी. तसेच प्रकल्पग्रस्तांच्या विद्यार्थ्यांनाही शाळेत ५० टक्के फी सवलतीची मागणी यावेळी पुढे आली. प्रकल्पग्रस्तांना अजून हेल्थ कार्ड मिळाले नाही. अशा ७८२ कुटुंबाना लगेच हेल्थकार्ड देण्याची कारवाई करण्याचेही पालकमंत्र्यांनी सूचित केले.
कुंभारी गावात७५ मे.वॉ.चा सौर प्रकल्प उभारा
भविष्यात एनटीपीसीच्या वीजनिर्मितीच्या वाढीव युनिटसाठी प्रकल्पाजवळील कुंभारी गावाच्या जमिनीचा प्रश्नासंदर्भात बोलताना ऊजार्मंत्री बावनकुळे म्हणाले, कुंभारी येथील ३०० एकर जागेवर एनटीपीसीने ७५ मेगावॉटचा नवीन सौर ऊर्जा प्रकल्प उभारावा. यासाठी आपण एनटीपीसीचे अध्यक्ष आणि केंद्र शासनाला विनंती करू. ही वीज विकत घेण्याचा करार महाराष्ट्र शासन करेल. यामुळे या भागातील शेतकºयांना दिवसा वीज उपलब्ध होईल, असेही बावनकुळे यांनी सांगितले.