खावटीची कीट स्वत: घेऊन जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:09 AM2021-08-29T04:09:55+5:302021-08-29T04:09:55+5:30
() नागपूर : आदिवासी विकास विभागातर्फे कोरोनाच्या काळात आदिवासी बांधवांसाठी खावटी योजना लागू करण्यात आली होती. त्यात दोन हजार ...
()
नागपूर : आदिवासी विकास विभागातर्फे कोरोनाच्या काळात आदिवासी बांधवांसाठी खावटी योजना लागू करण्यात आली होती. त्यात दोन हजार रुपयांच्या वस्तू खावटीच्या स्वरुपात दिल्या जाणार होत्या. त्या दोन हजार रुपयांच्या वस्तूंची कीट आता मिळायला सुरुवात झाली आहे. खावटीची धान्यकीट घरपोच देण्याचा शासन निर्णय होता. त्यासाठी वाहतुकीवर २४ कोटी रुपये खर्च करण्यात आला होता. परंतु, लाभार्थ्यांना ही कीट कुकडे लेआऊट येथील शासकीय वसतिगृहात जाऊन घ्यावी लागत आहे. विभागाकडून लाभार्थ्यांशी संपर्क करून कीट घेऊन जाण्यास सांगण्यात येत आहे. नागपूर येथील दूरवर पसरलेल्या स्लम वस्तीतील आदिवासी बांधवांना आपली रोजी बुडवून २०० ते ३०० रुपये ऑटोरिक्षा भाडे भरून स्वत: कीट न्यावी लागत आहे. प्रत्येक लाभार्थ्यांना ऑटोभाडे रक्कम २४ कोटी वाहतूक रकमेतून देण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदचे अध्यक्ष दिनेश शेराम यांनी केली आहे.