बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा : जिल्हाधिकारी अश्विन मुदगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 08:39 PM2019-07-24T20:39:00+5:302019-07-24T20:40:24+5:30

रुग्णांचे हित जपणे सर्वात आवश्यक असल्याने जिल्ह्यातील विनानोंदणीकृत खासगी व बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिले आहेत.

Take tough action on bogus medical practitioners: Collector Ashwin Mudgal | बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा : जिल्हाधिकारी अश्विन मुदगल

बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा : जिल्हाधिकारी अश्विन मुदगल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रुग्णांचे हित जपणे सर्वात आवश्यक असल्याने जिल्ह्यातील विनानोंदणीकृत खासगी व बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात बोगस वैद्यकीय व्यवसायींना आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई करणाऱ्या जिल्हास्तरीय पुनर्विलोकन समितीची बैठक झाली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर तसेच आरोग्य व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी अश्विन मुदगल म्हणाले, अनेक बोगस वैद्यकीय व्यावसायिक शहर व ग्रामीण भागांत दिशाभूल करणाऱ्या जाहिराती बेकायदेशीरपणे लावून रूग्णांची फसवणूक करताना आढळतात. अशांवर संबंधित यंत्रणांनी त्वरित कडक कारवाई करावी. ग्रामीण व शहरी हद्दीतील बोगस वैद्यकीय व्यावसायिकांची माहिती यंत्रणांनी समितीसमोर वेळोवेळी ठेवणे आवश्यक आहे. अधिकाऱ्यांनी तत्परतेने याची नोंद घ्यावी. अधिकाऱ्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात कोणतीही व्यक्ती बोगस वैद्यकीय व्यवसाय करणार नाही याची खात्री करावी. विनानोंदणी वैद्यकीय व्यवसाय करणारे आढळून आल्यास त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावेत. बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांविरुद्ध रीतसर कार्यवाही पोलिसांनी करावी, न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या प्रकरणांचा नियमित आढावा घेण्यात यावा. पॅथॉलॉजी लॅबची नोंदणी असणे गरजेचे असून यासंदर्भात संबंधित विभागाने तपासणी करण्याचे निर्देशही यावेळी जिल्हाधिकारी मुदगल यांनी दिले.
बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांविरूद्ध २०१७ मध्ये ४ तर २०१८ मध्ये २ गुन्हे दाखल करण्यात आले असून तालुकास्तरीय समितीकडे दाखल झालेल्या तक्रारींवरही कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

Web Title: Take tough action on bogus medical practitioners: Collector Ashwin Mudgal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.