रेल्वेकोचच्या दारात मोबाईलवर बोलत बसणे पडले महागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 10:51 AM2021-06-28T10:51:45+5:302021-06-28T10:54:21+5:30

Nagpur News कोचच्या दारावर बसून मोबाईलवर बोलत असताना यापूर्वी अनेकांना धक्का देऊन त्यांचे मोबाईल आरोपींनी लंपास केले आहेत.

Talking on a mobile phone at the door of a train coach was expensive | रेल्वेकोचच्या दारात मोबाईलवर बोलत बसणे पडले महागात

रेल्वेकोचच्या दारात मोबाईलवर बोलत बसणे पडले महागात

googlenewsNext
ठळक मुद्देमोबाईल पळविलाअज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

 लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : कोचच्या दारावर बसून मोबाईलवर बोलत असताना यापूर्वी अनेकांना धक्का देऊन त्यांचे मोबाईल आरोपींनी लंपास केले आहेत. शनिवारी रात्रीही एक प्रवासी बैतुलवरून नागपूरला येताना कोचच्या दारावरून त्याचा मोबाईल लंपास करण्यात आला. लोहमार्ग पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

कुलदिप तापीप्रसाद सिसोदिया (३२) रा. बैतुल असे या प्रवाशाचे नाव आहे. ते बैतुल ते नागपूर असा प्रवास जनरल कोचने करीत होते. नागपूरला डी कॅबिन परिसरात गाडीचा वेग मंदावला होता. यावेळी ते जनरल कोचच्या दारावर मोबाईलवर बोलत बसले होते. रेल्वे रुळाच्या बाजूला उभ्या असलेल्या एका असामाजिक तत्वाने काठीच्या साह्याने त्यांच्या हातावर वार करून १७ हजार रुपये किमतीचा मोबाईल खाली पाडला. त्यानंतर आरोपी मोबाईल घेऊन पसार झाला. नागपूर रेल्वेस्थानकावर येताच या प्रवाशाने लोहमार्ग पोलीस ठाणे गाठुन गुन्हा दाखल केला. लोहमार्ग पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास संदीप धंदर करीत आहेत.

...........

Web Title: Talking on a mobile phone at the door of a train coach was expensive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.