पूर आपत्तीसाठी तालुक्याला मिळाली ‘बोट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:10 AM2021-09-22T04:10:08+5:302021-09-22T04:10:08+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क उमरेड : पूर आपत्तीसाठी आणि विपरीत परिस्थितीचा सामना करण्यासाठी नागपूर आयुक्तालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने ...

Taluka gets 'boat' for flood disaster | पूर आपत्तीसाठी तालुक्याला मिळाली ‘बोट’

पूर आपत्तीसाठी तालुक्याला मिळाली ‘बोट’

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

उमरेड : पूर आपत्तीसाठी आणि विपरीत परिस्थितीचा सामना करण्यासाठी नागपूर आयुक्तालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील आठ तालुक्याला आठ बोट देण्यात आल्या आहेत. यामध्ये उमरेड तालुक्यालासुद्धा एक ‘बोट’ प्राप्त झाली असून, गावतलाव येथे राज्य आपत्ती प्रतिसाद दलाने याबाबतचे प्रशिक्षण दिले.

राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे पोलीस उपनिरीक्षक एम. एल. मोर्ला, एन. डी. जाधव, वाय. डी. नखाते, एस. एम. घाटोळे, व्ही. एस. खार्डे, एस. एन. वानखेडे, जी. डी. झलके आदींनी प्रशिक्षण दिले. तालुका पातळीवर एक बचाव पथक तयार करण्यात येणार असून, यामध्ये पोलीस कर्मचारी, महसूल विभाग, नगरपालिका अग्निशामक दलाचे कर्मचारी तथा पट्टीचे पोहणारे आदींचा या पथकात समावेश करण्यात आला आहे.

तालुक्यात कुठेही पूर परिस्थिती उद्भवली, आपत्ती आलीच तर हे बचाव पथक यासाठी काम करणार आहे. प्रशिक्षणादरम्यान प्रभारी तहसीलदार संदीप पुंडेकर, मुख्याधिकारी सुनील बल्लाळ, नायब तहसीलदार प्रदीप वरपे, पालिकेचे अभियंता जगदीश पटेल, नगरसेवक सतीश चौधरी, मंडळ अधिकारी मुकुंद भुरे, तलाठी ज्ञानेश्वर नागरे, पुंडलिक मांढरे, विनोद भजभुजे आदींची उपस्थिती होती.

Web Title: Taluka gets 'boat' for flood disaster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.