तालुका आराेग्य अधिकारी पडवे गाैरव पुरस्काराने सन्मानित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 04:39 AM2021-02-05T04:39:41+5:302021-02-05T04:39:41+5:30
हिंगणा : काेराेना काळात तालुक्यातील परिस्थिती यशस्वीपणे सांभाळून नागरिकांना आराेग्य सेवा दिल्याबद्दल तालुका आराेग्य अधिकारी डाॅ. प्रवीण पडवे यांना ...
हिंगणा : काेराेना काळात तालुक्यातील परिस्थिती यशस्वीपणे सांभाळून नागरिकांना आराेग्य सेवा दिल्याबद्दल तालुका आराेग्य अधिकारी डाॅ. प्रवीण पडवे यांना शासनातर्फे गाैरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रजासत्ताक दिनी आयाेजित कार्यक्रमात पालकमंत्री नितीन राऊत, विभागीय आयुक्त डाॅ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, जि. प. अध्यक्ष रश्मी बर्वे, मुख्य कार्यपालन अधिकारी याेगेश कुंभेजकर, जिल्हा आराेग्य अधिकारी डाॅ. दीपक सेलाेकर यांच्या उपस्थितीत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचे श्रेय वैयक्तिक नसून, तालुक्यातील त्या प्रत्येकांचा गाैरव आहे. ज्यांनी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या काेराेनापासून नागरिकांचा जीव वाचविला. रुग्णांना व विस्थापितांना अन्न, औषधी, आसरा, सुरक्षा, स्वच्छता, आराेग्य व मनाेधैर्य दिले. यात आराेग्य कर्मचारी, गटप्रवर्तक, आशासेविका, स्वच्छता कर्मचारी, शव वाहक, परिचर, वाहनचालक, अंगणवाडीसेविका, पर्यवेक्षिका, शिक्षक, सेवाभावी संस्था तसेच महसूल, पंचायत विभाग, पाेलीस व सुरक्षा यंत्रणा व लाेकप्रतिनिधी यांचे याेगदान असल्याचे डाॅ. पडवे यांनी सांगितले.