तामिळनाडू, गंगाकावेरी, चेन्नई एक्स्प्रेसमध्ये पकडली दारू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2019 12:05 AM2019-02-02T00:05:01+5:302019-02-02T00:06:26+5:30
रेल्वे सुरक्षा दलाने शुक्रवारी तामिळनाडु एक्स्प्रेस, गंगाकावेरी एक्स्प्रेस आणि लखनौ-चेन्नई एक्स्प्रेसमधून दारूची तस्करी करणाऱ्या एका महिलेला आणि पुरुषाला अटक करून त्यांच्याकडून २० हजार ६ रुपये किमतीच्या दारूच्या ४७९ बॉटल जप्त केल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेल्वे सुरक्षा दलाने शुक्रवारी तामिळनाडु एक्स्प्रेस, गंगाकावेरी एक्स्प्रेस आणि लखनौ-चेन्नई एक्स्प्रेसमधून दारूची तस्करी करणाऱ्या एका महिलेला आणि पुरुषाला अटक करून त्यांच्याकडून २० हजार ६ रुपये किमतीच्या दारूच्या ४७९ बॉटल जप्त केल्या.
शुक्रवारी दुपारी १.५४ वाजता आरपीएफचा जवान शशिकांत गजभिये, सुषमा ढोमणे हे राज्य उत्पादन शुल्क विभागासोबत गस्त घालत होते. प्लॅटफार्म क्रमांक २ वर उभ्या असलेल्या १२६२२ तामिळनाडु एक्स्प्रेसच्या एस १ कोचमध्ये त्यांना एक महिला संशयास्पद स्थितीत आढळली. तिची चौकशी केली असता तिने समाधानकारक उत्तर दिले नाही. तिला आरपीएफ ठाण्यात आणून उपनिरीक्षक विद्याधर यादव यांच्या समोर हजर करण्यता आले. तिने आपले नाव सुनिता संजय काळे (५५) रा. महाकाली वॉर्ड, चंद्रपूर सांगितले. तिने साडीच्या आत दारूच्या ३७५० रुपये किमतीच्या ३९ बॉटल लपविल्याचे उघड झाले. दुसºया घटनेत सकाळी ११.११ वाजता प्लॅटफार्म क्रमांक २ वर १६०९४ लखनौ-चेन्नई एक्स्प्रेसच्या इटारसी एण्डकडील जनरल कोचमध्ये एक व्यक्ती संशयास्पद स्थितीत चढताना आढळली. चौकशी केली असता तिने समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यास आरपीएफ ठाण्यात आणले असता आपले नाव बाळकृष्ण नागोजी नागपुरे (२३) रा. झिंगुजी वॉर्ड, भद्रावती, चंद्रपूर सांगितले. त्याची तपासणी केली असता त्याच्याजवळ दारूच्या ३१०० रुपये किमतीच्या २२ बॉटल आढळल्या. तिसºया घटनेत गुरुवारी रात्री ९.३० वाजता प्लॅटफार्म क्रमांक २ वर १२६७० गंगाकावेरी एक्स्प्रेसच्या स्लिपर कोचमध्ये २ बॅग बेवारस स्थितीत आढळल्या. आजूबाजूच्या प्रवाशांनी या बॅगवर आपला हक्क सांगितला नाही. संशयाच्या आधारे बॅगची तपासणी केली असता त्यात दारूच्या १० हजार ९२० रुपये किमतीच्या ३३२ बॉटल आढळल्या. गंगाकावेरी एक्स्प्रेसमध्ये इंजिन जवळील जनरल कोचमध्ये बेवारस बॅग आढळली. त्यात २२३६ रुपये किमतीच्या दारूच्या ८६ बॉटल होत्या. जप्त केलेली दारू राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सुपूर्द करण्यात आली.